AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजपाल यादवला आतापर्यंत मिळाली इतक्या कोटींची मदत; कधीपर्यंत होऊ शकते तुरुंगातून सुटका?

अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगात असून त्याच्या सुटकेसाठी अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. राजपालवर तब्बल 9 कोटी रुपयांचं कर्ज आहे. चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

राजपाल यादवला आतापर्यंत मिळाली इतक्या कोटींची मदत; कधीपर्यंत होऊ शकते तुरुंगातून सुटका?
Rajpal Yadav Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 12, 2026 | 9:32 AM
Share

अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगात आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा राजपाल सध्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाचा सामना करतोय. 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्सप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास मनाई केली. त्यानंतर राजपालला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं. मी एकटा पडलोय, माझा कोणी मित्रही नाही.. अशी भावूक प्रतिक्रिया त्याने सरेंडर करण्यापूर्वी दिली होती. त्यानंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतून अनेकजण त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

राजपाल यादवला कोणाकोणाची मदत?

  • ‘जेमट्युन्स म्युझिक’चे मालक इंदरजीत सिंह यांनी 1.1 कोटी रुपयांची मदत केली आहे.
  • जनशक्ती जनता दलचे (JJD) प्रमुख तेज प्रताप यादव यांनी घोषणा केली की ते राजपाल यादवची 11 लाख रुपयांची मदत करणार आहेत.
  • कमाल आर खान उर्फ केआरकेनं राजपालची 10 लाख रुपयांची मदत केली आहे.
  • गुरमीत चौधरी, सलमान खान, वरुण धवन, अजय देवगण, गुरू रंधावा आणि सोनू सूद यांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु ते किती पैशांची मदत करतील, याचा खुलासा त्यांनी केला नाही.

आतापर्यंत किती कोटी रुपयांची मदत मिळाली?

राजपाल यादवच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. काही लोकांनी सांगितलं की ते कोट्यवधींची मदत करतील, तर काहींनी फक्त इतकंच सांगितलं की ते मदत करतील. अशाप्रकारे आतापर्यंत जवळपास 1.32 कोटी रुपयांची मदत घोषित झाली आहे.

राजपाल तुरुंगातून बाहेर कधी येणार?

इंदरजीत सिंह यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात त्यांनी राजपाल यादवच्या छोट्या भावाशी चर्चा केली होती. या व्हिडीओत त्यांनी हेसुद्धा सांगितलं की 14 फेब्रुवारीपर्यंत ठराविक रक्कम जमा झाली नाही तर ते स्वत: उर्वरित रक्कम कोर्टात जमा करतील. जेणेकरून महाशिवरात्रीपर्यंत राजपाल यादवची तुरुंगातून सुटका होऊ शकेल. तर दुसरीकडे राजपालच्या मॅनेजरने सांगितलं की 12 फेब्रुवारी म्हणजेच आज त्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

2010 मध्ये राजपाल यादवने एम. एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून त्याच्या एका चित्रपटासाठी पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ‘अता पता लापता’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजपाल करत होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यामुळे त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. व्याज, दंड, विलंबित देयकं यांमुळे थकबाकीची रक्कम जवळपास 9 कोटी रुपयांपर्यंत वाढली. कर्ज चुकवण्यासाठी त्याने कर्जदात्याला अनेक चेक्स दिले होते. परंतु हे चेक्स बाऊन्स झाले. त्यामुळे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू झाली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...