AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे नाहीत, एकटा पडलोय.. तुरुंगात भावूक झालेल्या राजपालच्या मदतीला धावला सोनू सूद

तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलेल्या राजपाल यादवच्या मदतीला अभिनेता सोनू सूद धावून गेला आहे. चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवने सरेंडर केलं आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा पडलोय, असं म्हणत तो भावूक झाला.

पैसे नाहीत, एकटा पडलोय.. तुरुंगात भावूक झालेल्या राजपालच्या मदतीला धावला सोनू सूद
Rajpal YadavImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 10, 2026 | 2:13 PM
Share

आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या समस्येचा सामना करतोय. चेक बाऊन्स प्रकरणात त्याने स्वत:ला दिल्लीतल्या तिहार तुरुंगात सरेंडर (आत्मसमर्पण) केलं आहे. आत्मसमर्पण करण्याआधी तो तुरुंगातील अधिकाऱ्यांसमोर भावूक झाला होता. “माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा पडलोय आणि दुसरा कोणता मार्गही मला दिसत नाहीये”, असं तो म्हणाला होता. या संकटकाळात आता अभिनेता सोनू सूद त्याच्या मदतीला धावून आला आहे. इतकंच नव्हे तर त्याने इंडस्ट्रीतील इतरांनाही राजपालची मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

सोनू सूदची पोस्ट-

राजपाल यादव हा अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे, ज्याने आपल्या इंडस्ट्रीत गेल्या अनेक वर्षांपासून अविस्मरणीय योगदान दिलं आहे. कधीकधी आयुष्य आपल्या अन्याय्यपणे वागतं, प्रतिभेमुळे नाही तर आपली वेळ क्रूर असू शकते. तो माझ्या चित्रपटाला भाग असेल आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी.. निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि सहकाऱ्यांनी एकत्र यावं. एक छोटीशी साइनिंग अमाऊंट (चित्रपटाच्या सुरुवातीला देण्यात येणारी रक्कम) ही भविष्यातील कामाच्या बदल्यात दिलेला सन्मान आहे, हे दान नाही. जेव्हा आपल्यातील एखादा कठीण काळातून जात असेल, तेव्हा इंडस्ट्रीने त्याला आठवण करून दिली पाहिजे की तो एकटा नाही. असं करून आपण दाखवून देतो की आपण या इंडस्ट्रीपेक्षा मोठे आहोत’, अशी पोस्ट सोनू सूदने लिहिली आहे.

सोनू सूदच्या आगामी चित्रपटात राजपाल काम करणार असून त्या चित्रपटाची साइनिंग अमाऊंट त्याने मदत म्हणून दिली आहे. त्याचप्रमाणे हे दान नसून हा सन्मान असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राजपाल यादवचं हे प्रकरण 2010 पासून सुरू आहे. त्याने त्याच्या ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. ज्यामुळे राजपालचं मोठं नुकसान झालं होतं. चित्रपटासाठी घेतलेलं कर्ज फेडणं त्याला शक्य झालं नाही. राजपालने जे चेक दिले होते, ते बाऊन्स झाले होते. अखेर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.

2018 मध्ये दिल्लीतल्या एका दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्यावेळी त्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. राजपालने दिल्ली उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं होतं. जून 2024 मध्ये उच्च न्यायालयाने राजपालच्या प्रकरणात सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक उपाययोजना अवलंबवण्याचं आवाहन केलं होतं. त्याचप्रमाणे त्याची शिक्षा तात्पुरती स्थगित केली होती. परंतु राजपालकडून रक्कम अद्याप भरली न गेल्याने अखेर 2 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालायने त्याला आत्मसमर्पणाचे निर्देश दिले. तोवर त्याने तक्रारदाराला रक्कम परत करण्याच्या वचनांचं वारंवार उल्लंघन केलं होतं.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?