AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकर कांड… बंद कॅफेत पहाटेपर्यंत पार्टी, त्यानंतर जे घडलं त्याने दिल्ली हादरली; तरुणीवर गँगरेप

दिल्लीच्या प्रीत विहार येथील बंद कॅफेत पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत एका 22 वर्षीय तरुणीवर तिच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना. या प्रकरणी तिघांना अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत. या घटनेने राजधानी दिल्लीत महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

भयंकर कांड... बंद कॅफेत पहाटेपर्यंत पार्टी, त्यानंतर जे घडलं त्याने दिल्ली हादरली; तरुणीवर गँगरेप
Saltanat Cafe DelhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 11:32 AM
Share

सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने राजधानी दिल्ली हादरून गेली आहे. दिल्लीच्या प्रीत विहार येथील एका कॅफेत रात्रभर पार्टी सुरू होती. यावेळी एका 22 वर्षीय तरुणीवर तिच्या दोन सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन महिलांसहीत तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर तिघे फरार आहेत. पोलिसांच्या मते, पीडित तरुणी आणि आरोपी एकाच कॅफेत काम करत होते. ही घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे दिल्लीत चांगलीच खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या प्रीत विहार येथील ‘सल्तनत कैफे’मध्ये ही तरुणी आपल्या सहकाऱ्यांसोबत पार्टीत सामील झाली होती. रात्री 11.30 वाजता कॅफे बंद झाल्यावरही हा ग्रुप आत बसून पार्टी करत होता. दारू पित होता, डान्स करत होता. या कॅफेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडे कॅफेची चावी होती. त्यामुळे रात्रभर या लोकांची पार्टी सुरू होती. ही पार्टी 24 नोव्हेंबरच्या पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर सर्व लोक कॅफेच्या बाहेर आले. मात्र, आपल्यावर दोन पुरुषांनी बलात्कार केला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली, असा आरोप या महिलेने केला आहे.

चार पुरुष, दोन महिला अटकेत

महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत चार पुरुष आणि दोन महिलांविरोधात अशा सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत दोन महिलांसह तीन संशियत आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी टीम तयार केली असून या टीमकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू करण्यात आली आहे.

तरुणी पहाटेच पोलीस ठाण्यात

ही पीडीत तरुणी पहाटे 5.45 वाजता पोलीस ठाण्यात आली आणि तिने तक्रार दाखल केली आहे. कॅफेतून बाहेर पडल्यावर या महिलेने लगेच पोलिसांकडे तक्रार केली नाही. ही महिला एक पुरुष आणि दोन अन्य महिलांसोबत गाडीत बसून जात असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलिसांनी या महिलेची सविस्तर तक्रार नोंदवली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका मॅजिस्ट्रेट समोरही या महिलेची साक्ष नोंदवली गेली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची चर्चा सुरू झाली आहे.

ऑगस्टमध्येही सामूहिक बलात्कार

यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी ग्रेटर नोएडामध्ये चालत्या बसमध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथितपणे सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. पकडण्यात आलेला आरोपी कुलदीप हा बस ड्रायव्हर असून संदीप हा कंडक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. उत्तर दिल्लीतील तिमारपूर परिसरातील एका पार्किंगमध्ये ही घटना घडली होती.

Follow Us
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी....
Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद