AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

500 आचारी, 5 लाख पाहुणे… आमदाराच्या लेकीच्या लग्नाला सुरुवात, जेवणाबाबत घेतला मोठा निर्णय

सध्या संपूर्ण देशात आमदार अनंत सिंह यांच्या लेकीच्या शाही लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे. या लग्नाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. अनंत सिंह यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

500 आचारी, 5 लाख पाहुणे... आमदाराच्या लेकीच्या लग्नाला सुरुवात, जेवणाबाबत घेतला मोठा निर्णय
अनंत सिंहImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 11:16 AM
Share

सध्या देशात एका लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नाला येण्यासाठी पाहुण्यांना हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. या पाहुण्यांसाठी खास वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. घोडे, शाही भोजन असा थाट उभा करण्यात आला आहे. आम्ही बाहुबली आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंहच्या लग्नाविषयी बोलत आहोत. देभरात चर्चेत असणारे हे लग्न आज होणार आहे. लग्नात ५ लाख पाहुण्यांसाठी भव्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे VVIP आणि सामान्य पाहुण्यांना एकसारखेच जेवण मिळणार आहे.

पाहुण्यांच्या जेवणात पुलाव, पुरी, डाळ, रायता, तीन प्रकारच्या भाज्या, पनीरची भाजी, डाळ मखनी, लिट्टी-चोखा, नान, तंदूरी रोटी, सॅलड, पापड आणि लोणचे वाढले जाणार आहे. तर स्टार्टरमध्ये चाट, गोलगप्पे, आलू टिक्की, डोसा, इडली, चाऊमीन, पिझ्झा, पास्ता आणि बर्गरची व्यवस्था करण्यात आली राहील. मिठाईत रसमलाई, गुलाबजामून, काजू कतली, राजभोग, मालपुआ आणि खाजा यांच्यासह अनेक प्रकारच्या मिठाई वाढण्यात येणार आहेत.

आतापर्यंत 80 टनांहून अधिक रसमलाई तयार

आतापर्यंत 80 टनांहून अधिक रसमलाई तयार करण्यात आली आहे. ५० हजार लिटर दुधापासून रसमलाई बनवली जात आहे. ५०० हून अधिक कारागीर ३०० चुलींवर लग्नाचे जेवण तयार करणार आहेत. अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात सुमारे ४ लाख लोकांचा सहभाग अपेक्षित आहे, तर ५ लाख पाहुण्यांसाठी जेवण तयार केले जाईल. VVIP पाहुण्यांसाठी सुमारे १० एकर जमिनीवर भव्य मांडव उभारण्यात आला आहे.

सामान्य पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था

येथे ३० स्टॉल्स लावले जाणार आहेत. येथे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असणार आहेत. तर सामान्य पाहुण्यांसाठी सुमारे १५ बिघा जमिनीत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी सात वेगवेगळे मांडव उभारण्यात आले आहेत. या मांडवांमध्ये जेवण बनवण्यापासून ते पाहुण्यांना जेवण वाढण्यापर्यंतची व्यवस्था करण्यात आली आहे. लदमा गावात प्रवेश करताच एक भव्य द्वार उभारण्यात आले आहे. हे द्वार त्यांचा मोठा भाऊ दिलीप सिंह यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आला आहे. याच दारावर एक मोठी बॅरिकेडिंगसह आमदारांचे समर्थक बसले आहेत. गावाची रस्ता अरुंद आहे. गावात जाम लागू नये म्हणून सर्व गाड्या गावाबाहेरच थांबवल्या जात आहेत.

Follow Us
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी....
Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण