शाखेत चड्डी घालून हातात लाठी घेऊन जाणाऱ्यांना.. अभिजीत दिपके यांची थेट टीका..
अभिजीत दिपके यांनी नुकताच गंभीर आरोप केले. हेच नाही तर त्यांनी नाव न घेता जोरदार टीका केली, संघावर बोट ठेवताना अभिजीत दिपके दिसले आहेत. अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका केली.

अभिजीत दिपके यांनी नुकताच मोठे विधान केले. संजय राऊत यांनी डिलीटेशनसाठी एका खासदाराचा दर 150 कोटी असल्याचा आरोप केला. यावर बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, 50 वरून आता 150 कोटी रुपये झाले का? चांगले आहे, महागाई वाढत चालली आहे तर खासदाराचे रेट सुद्धा वाढत चालले आहेत. जनतेला काही भेटू का न भेटू मात्र, आमदाराचे आणि खासदाराचे खिसे भरले गेले पाहिजे त्यांना गाड्या घोड्या भेटल्या पाहिजे. भाजप जर आपण राजकारण पाहिलं तर सुरुवातीला आमदार खरेदी पासून सुरुवात केली.कर्नाटकमध्ये सरकार पाडलं, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडलं, आता आपण बघतोय 13 कोटी मत डिलीट झाले संपूर्ण देशात.
2024 च्या निवडणुकीत इंडियाची सरकार दोन टक्क्याच्या गॅपने तयार झाली होती तुम्ही जर 13 -14 कोटी मतदान जर डिलीट करताय तर आपल्या देशात 98 कोटी मतदार आहेत, जवळपास 13 – 14 टक्के मतदान तुम्ही डिलीट केला आहे. जिथे दोन टक्क्यावर निवडणूक आढळतात तिथे 13 14 टक्के तुम्ही जर मतदान डिलीट केल असेल तर निवडणूक घेताच कशाला.
निवडणूक घ्यायची गरज नाही सरळ म्हणा आजपासून नरेंद्र मोदी देशात पंतप्रधान असणार आहेत. उपकार करण्यासारखी निवडणूक घेतात मतदान कोणालाही करणार सत्ता भाजपाची. सौरभ दास यांना ऑक्सफर्ड युनियनने बोलावलं होतं सोशल मीडियावर दावा. भाजप आणि त्यांचे समर्थक न कधी शाळेत गेले ना कधी कॉलेजला गेले त्यामुळे त्यांना युनिव्हर्सिटी काय असतं, युनियन काय असतं हे त्यांना माहित नाही.
ऑक्सफर्ड युनियन जे आहे ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा जास्त. पण ते कळेल कोणाला ? त्याला कळेल जे शाळेत गेले आहेत, शाखेत जाणार आहेत त्यांना काय कळणार. शाखेत चड्डी घालून हातात लाठी घेऊन जाणाऱ्यांना त्यांना गोष्टी काय करणार आहेत. त्यांचे जे महामानव आहेत ते कधी कॉलेजला गेले नाहीत. तुमचे जे महामानवाने त्यांची डिग्री दाखवा अगोदर तुम्हाला डिग्री दाखवून होत नाही आणि तुम्ही निघाले ज्ञान द्यायला.
CJP कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही आमचा दृष्ट स्टँड आहे ती कुणाची सरकार बनवायला. आमचा स्टॅन्ड आहे की देशात निवडणुकीचे मुद्दे काय असले पाहिजे, आपल्या देशात 47% तरुण लोकसंख्या आहे. आपल्या देशातील निवडणुका युवकाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे, शिक्षण चांगलं झालं पाहिजे रोजगार भेटला पाहिजे आरोग्य सुविधा भेटल्या पाहिजे. कोणत्या मंदिराच्या खाली मज्जीत आहे कोणत्या मज्जतीच्या खाली मंदिर आहे यापुढे जाऊन निवडणुका झाल्या पाहिजे.
मग भाजपाने सरकार सोडून द्यावं, काँग्रेसची किंवा दुसरी कोणती सरकार बसवून द्यावी आम्ही याच मुद्द्यावर आंदोलन करू मग भाजपला फायदा होईल त्याचा. जर तुम्हाला आंदोलनाचा एवढा त्रास आहे तर सरकारमधून तुम्ही उतरून जा, दुसरे कोणी बसवा आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करू. जे जबाबदार आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्याच्या विरोधातच आंदोलन करावे लागेल. त्यात आमची चुकी आहे का भाजपचे सरकार आहे, 22 राज्यात त्यांचे सरकार आहे मग देशभरात कोण.
