मोठी बातमी! अखेर घोषणा, एनडीएमध्ये नव्या भिडूची एन्ट्री, भाजपने मोठा गेम खेळला, विरोधाकांना जबर धक्का
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर एनडीएमध्ये आता आणखी एका नव्या पक्षाची एन्ट्री झाली आहे. या नव्या एन्ट्रीमुळे विरोधकांच्या अडचणी वाढणाची शक्यता आहे. भाजपाने मोठा गेम खेळला आहे.

पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, तब्बल सहा वर्षांनी पुन्हा एकदा पंजाबमध्ये मोठा पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोमणी अकाली दलाने घेतलेल्या या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की, शिरोमणी अकाली दलाने एनडीएसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि एसएडीची युती पंजाबमध्ये नागरिकांची पहिली पसंती असेल, असा विश्वासही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी भाजप आणि एसएडीकडून पंजाबमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. युती होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबी यांच्या कल्याणाला प्राथमिकता दिली आहे. मला आज आनंद होत आहे की, शिरोमणी अकाली दल आता एनडीए कुटुंबाचा एक भाग बनला आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना मोदी म्हणाले की, भाजप आणि शिरोमणी अकाली दल ही एक नैसर्गिक युती आहे. आम्ही पंजाबला एक चांगलं सरकार देऊ, जे सरकार पंजाबमध्ये विकासाचा एक नवा उच्चांक प्रस्थापित करेल. मला पूर्ण विश्वास आहे की, आमची ही युतीच नागरिकांची पंजाबमध्ये पहिली पसंती असेल. आम्ही पंजाबला एक चांगलं सरकार देऊ.
काँग्रेस, आपचं टेन्शन वाढलं
दरम्यान सध्या पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा देखील बऱ्यापैकी प्रभाव आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येच लढत होईल असा अंदाज वर्तवला जात असतानाच आता भाजपने देखील शिरोमणी अकाली दलासोबत युती करून मोठा गेम खेळला आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. हा विरोधकांसाठी मोठा धक्का असणार आहे.
