AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराज ‘या’ किल्ल्यावर ठेवायचे स्वराज्याचा खजिना; तुम्हाला नाव माहीत आहे का?

लोहगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक महत्त्वाचा दुर्ग आहे, जो पुण्याजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी अनेकवेळा जिंकला, इथे स्वराज्याचा खजिना सुरक्षित ठेवला होता.

छत्रपती शिवाजी महाराज 'या' किल्ल्यावर ठेवायचे स्वराज्याचा खजिना; तुम्हाला नाव माहीत आहे का?
Lohagad FortImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 5:53 PM
Share

छत्रपती शिवाजी महाराजांनी अथक संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं होतं. जीवाभावाच्या मावळ्यांना सोबत घेऊन बलाढ्य मुघल सल्तनतीला शिवाजी महाराजांनी आव्हान दिलं होतं. शिवाजी महाराज म्हणजे शत्रूंचे कर्दनकाळ होते. मातीच्या अस्मितेसाठी लढणारा महान योद्धा म्हणूनही छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासात नोंद आहे. स्वराज्यातील नागरिकांची शिवाजी महाराज काळजी घ्यायचे. त्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का बसणार नाही, याची खबरदारी घ्यायचे. त्यासाठीच स्वराज्याचा खजिना ते सुरक्षित ठिकाणी ठेवायचे.

लोहगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला पुण्यापासून 52 किलोमीटरवर आहे. सह्याद्रीच्या कुशीत हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1,033 मीटरवर आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या मते, लोहगड किल्ल्याचा इतिहास सुमारे एक हजार वर्षाचा आहे. 10 व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती झाली. लोहमतमिया वंशाच्या काळात या किल्ल्याचे निर्माण कार्य सुरू झालं. या किल्ल्यावर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजाम, मुघल आणि मराठा शासकांचा अधिकार राहिला आहे. या काळात हा किल्ला अधिकच मजबूत होत गेला.

प्रवेशद्वार किती?

या किल्ल्यात चार प्रवेशद्वार आहेत. यात गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महा दरवाजाचा समावेश आहे. या दरवाज्यावरील नक्षीकाम मराठी कला आणि संस्कृतीचा अद्भूत नमूना आहे. या किल्ल्याचा एक भाग विंचवाच्या शेपटीच्या आकाराचा आहे. त्याला विंचू कडाही म्हटलं जातं. या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वत रांगाचं दर्शन होतं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648मध्ये हा किल्ला मिळवला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल साम्राज्याचे सेनापती राजा जयसिंह प्रथम यांच्यात 11 जून 1665मध्ये पुरंदरचा तह झाला होता. यावेळी शिवाजी महाराजांना आपल्याकडचे 23 किल्ले द्यावे लागले होते. जे किल्ले देण्यात आले, त्यात लोहगडाचाही समावेश होता. मात्र, 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकला होता. त्यांनी सुरतमध्ये मिळालेला खजिना याच किल्ल्यात सुरक्षितपणे ठेवला होता. लोहगडावरही शिवाजी महाराज स्वराज्याचा खजिना ठेवायचे.

बौद्ध भिक्खू आणि जैन मुनींचं ठिकाण

पेशव्यांचे मंत्री नाना फडणवीस यांनी या किल्ल्यात आश्रय घेतला होता. त्यांनी या किल्ल्यावर एक मोठा जलाशय आणि बावडीची निर्मिती केली होती. या दोन्ही गोष्टी आजही किल्ल्यावर आहेत. काही ट्रॅकर्संना सप्टेंबर 2019मध्ये किल्ल्याच्या दक्षिणेकडे एका गुफेत ब्राह्मी लिपीतील प्राचीन शिलालेख सापडले होते. दुसऱ्या किंवा पहिल्या शतकातील हे शिलालेख असल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे. या ठिकाणी जैन मूनी राहत असल्याचंही यावरून स्पष्ट झालं. लोहगड किल्ल्याच्या समोरच काही गुंफा आहेत. या गुंफा बौद्धकालीन आहेत. या ठिकाणी बुद्ध आणि चैत्य कोरलंलं आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षू ध्यान धारणा करायचे. बौद्ध भिक्खू इथे राहत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

Follow Us
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी
संदीप देशपांडेंच्या व्हिडिओवर सचिन अहिर आक्रमक; मांसाहार बंदीवरही...
संदीप देशपांडेंच्या व्हिडिओवर सचिन अहिर आक्रमक; मांसाहार बंदीवरही सरकारला घरचा आहेर!
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने..
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मनसे आक्रमक