AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....

Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच….

| Updated on: Nov 25, 2026 | 10:37 AM
Share

रोहित पवारांनी नागपूरमध्ये गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त सुप्रिया सुळे यांनी फेटाळले आहे, याला हास्यास्पद म्हटले आहे. रोहित पवार नागपूरमध्ये नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सूत्रांनुसार, रोहित पवारांनी ४ ते ९ डिसेंबरच्या मोर्च्यासाठी विदर्भातील नेत्यांची गोपनीय बैठक घेतल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे वरिष्ठांमध्ये नाराजी आहे.

रोहित पवारांनी नागपूरमध्ये गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावले आहे. “रोहित पवारांनी गुप्त बैठक घेतल्याचं मी पहिल्यांदाच ऐकतेय. ही गोष्ट हास्यास्पद आहे,” अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे. तसेच, रोहित पवार नागपूरमध्ये नव्हते, त्यांचे लोकेशन तपासा असेही त्यांनी स्पष्ट केले. एका पक्षाची गुप्त बैठक कशी असू शकते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी नागपूरमध्ये पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेतली होती. आगामी ४ ते ९ डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आयोजित भव्य मोर्च्याच्या तयारीसंदर्भात ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. रोहित पवारांनी मोर्च्याबाबत पक्षातील नेत्यांना विश्वासात घेतले नसल्यामुळे सुप्रिया सुळेंसह वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्या विदर्भातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. नागपूरमध्ये दोन दिवस मुक्कामी असताना रोहित पवारांनी आपला दौरा पूर्णपणे गुप्त ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत वरिष्ठांची मनधरणी कशी करायची यावर चर्चा झाल्याचे समजते.

Published on: Nov 25, 2026 10:37 AM

Follow Us