AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितली, संजय राऊत यांचा नवा बॉम्ब, महाराष्ट्र हादरला!

मंत्री संजय शिरसाट यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. लातूरमधील अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावासाठी ही मागणी झाल्याचे राऊत म्हणाले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंत्र्यांना टीप दिल्यानंतर त्यांनी लाच घेतल्याशिवाय काम करणार नाही, असा पवित्रा घेतला. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितली, संजय राऊत यांचा नवा बॉम्ब, महाराष्ट्र हादरला!
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 10:51 AM
Share

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लातूरमधील एका सामाजिक कार्यकर्त्याकडून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने होणाऱ्या ट्रेनिंग सेंटरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 5 कोटी रुपये मागितले आहेत. याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आल्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने याची टीप मंत्र्याला दिली. मंत्र्याने त्यानंतर लाच घेतल्याशिवाय कामच करणार नाही, असा हेकाच धरला, असा खळबळजनक दावा करतानाच संजय शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घ्या, अशी मागणीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याला खूप अपेक्षा होत्या. फडणवीस राज्य योग्य पद्धतीने सांभाळतील असं वाटत होतं. पण भवरश्याच्या म्हशीला टोणगा असा कारभार राज्यात सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा प्रशासन आणि मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण दिसत नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारातलं नंबरवन राज्य झालं आहे. दुष्काळाची होरपळ आणि भ्रष्टाचारातही होरपळ सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.

25 कोटींच्या प्रस्तावासाठी 5 कोटीची लाच

काल संभाजीनगरला आल्यावर लातूरचे एक सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर मला भेटले. उदगीरकर हे मातंग समाजाचे नेते आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लातूरमध्ये ट्रेनिंग सेंटर उभं करण्यासाठी उदगीकर यांनी प्रस्ताव दिला होता. त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. 25 कोटी रुपयांचं ट्रेनिंग सेंटर उभारायचं होतं. त्यात दलित मुलं आणि मातंग समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण मिळावं किंवा शैक्षणिक कार्यक्रम व्हावेत म्हणून हा प्रस्ताव दिला होता. खरं तर अशा प्रस्तावाला वाट पाहायला लागू नये. पण उदगीरकर हे वारंवार हेलपाटे मारत होते. ओएसडी सिद्धार्थ भंडारी यांनी मंत्र्यांना भेटल्याशिवाय काम होणार नाही म्हणून उदगीरकर यांना सांगितलं, असं राऊत म्हणाले.

मंत्रीच डील करायला बसले

मंत्र्यांनी उदगीरकरांना भेटायला बोलावलं. समोरासमोर बसवलं. मंत्री शिरसाटच डीलिंगला बसले होते. मी 25 कोटी मंजूर करतो. पण तुला मला 5 कोटी द्यावे लागतील. उदगीकर म्हणाले, दलितांसाठी काम करत आहे. 5 कोटी कुठून देऊ? थोडेफार देऊ शकतो. त्यावर मंत्र्याने प्रस्ताव मंजूर होणार नाही म्हणून सांगितलं. अजूनही प्रस्ताव अजूनही मंजूर झाला नाही. आणि हे लोक बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. मी सांगतो ते तथ्य तपासा. नरसिंग उदगीरकर यांना बोलवा. ते काय सांगतात ते ऐकून घ्या, असं आवाहनही राऊत यांनी केलं.

नांगरे पाटील यांना भेटले, पण…

उदगीरकर हे कंटाळून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना भेटले. त्यांना या प्रकरणाची कल्पना दिली. मंत्री पैसे मागत आहेत म्हणून सांगितलं. आपण सापळा रचूया. महाराष्ट्राला दाखवूया, असा आग्रह धरला. पण लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातून मंत्र्यांना टीप गेली. तुमच्या विरोधात सापळा रचला जात आहे, असं मंत्र्यांना सांगितलं गेलं, असा दावाही त्यांनी केला.

आता लाच घेतल्याशिवाय….

तुम्ही लाचलूचपत विभागात तक्रार गेल्यानंतर त्याची माहिती मंत्र्यांना मिळते. त्यानंतर मंत्री म्हणतात, तुम्ही माझ्या विरोधात लाचलूचपत विभागात जाऊन तक्रार करता? आता लाच घेतल्याशिवाय मी कामच करणार नाही. शिंदे काय करून ठेवलंय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी या मंत्र्यांना मंत्री केलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र ठाकरेंचा आभार मानतोय, असं ते म्हणाले.

शिरसाटांची 27 प्रकरणं

शिरसाट यांचं हे पहिलं प्रकरण नाही. त्यांची 27 प्रकरणं माझ्याकडे आहेत. प्रत्येक प्रस्तावात त्यांनी किती पैसे घेतले याची माहिती माझ्याकडे आहे. प्रत्येकाचे पैसे कुठे कसे स्वीकारले हे मला माहीत आहे. धक्के मारण्यापेक्षा त्यांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र हादरून जाईल. एकनाथ शिंदे यांनी अशा मंत्र्यांना पक्षातून काढलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

7-8 मंत्र्यांची प्रकरणं माझ्याकडे

शिरसाट यांनी अजूनही तो प्रस्ताव मंजूर करावा. नाही तर मी स्वत: 5 कोटी रुपये जमा करून लाच म्हणून शिरसाट यांना देईन. मी जनतेला भीक मागेल. पैसा गोळा करून त्यांना देईन, असं सांगतानाच राज्यातील सात ते आठ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं माझ्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

उदगीरकर काय म्हणाले?

यावेळी नरसिंग उदगीरकर यांनीही या प्रकरणाची माहिती दिली. शिरसाट यांनी मला मुंबईतील नाथानी हाऊसमध्ये बोलावलं होतं. मंत्र्यांनी प्रस्तावाबाबत विचारला. भंडारी यांनी प्रस्ताव काय आहे याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर मंत्र्याने 20 टक्के रक्कम द्यावी लागेल म्हणून सांगितलं. दिले नाही तर प्रस्ताव मंजूर होणार नाही, असं शिरसाट म्हणाले. मी त्यांना माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगितलं. मी एसीबीकडे जाऊन तक्रार केली. त्यानंतर पुन्हा मंत्र्यांकडे गेलो. त्यावेळी ओएसडी म्हणाला, तुम्ही वरळीला गेला होता का? मी नाही म्हटलं. तेव्हा, तुम्ही खोटं बोलत आहात. तुमचा प्रस्ताव मंजूर करणार नाही. पैसे दिल्याशिवाय काम होणारच नाही, असं ओएसडी मला म्हणाला, असा दावा नरसिंग उदगीरकर यांनी केला आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी....
Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी