AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगल्या चेहऱ्याची वाट लावली..; सर्जरीमुळे बदलला जॅस्मिन भसीनचा लूक? कमेंट्सवर म्हणाली..

Jasmine Bhasin: बदललेल्या लूकवरून प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्स केल्याचा आरोप करणाऱ्या ट्रोलर्सना अभिनेत्री जॅस्मिन भसीनने सुनावलं आहे. तिची सोशल मीडियावर पोस्ट आणि काही फोटो यामुळे चर्चेत आले आहेत.

| Updated on: Nov 25, 2026 | 11:35 AM
Share
टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन सध्या तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे काही नवे फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या दिसण्यावरून वेगवेगळे तर्क लावण्यास सुरूवात केली. काहींनी तिने प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स किंवा फिलर्स केल्याचा दावा केला. मात्र या सततच्या चर्चांमुळे जॅस्मिन चांगलीच संतापली असून तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

1 / 5
जॅस्मिन भसीन नुकतीच कोलकातामधल्या एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील जॅस्मिनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचं लक्ष तिच्या लूककडे गेलं. काहींनी तिच्या चेहऱ्यात बदल झाल्याचं म्हटलं, तर काहींनी तिने कॉस्मेटिक सर्जरी केल्याचा अंदाज व्यक्त केला. बोटॉक्स आणि फिलर्स केल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. अखेर या चर्चांवर जॅस्मिनने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.

2 / 5
ट्रोलर्सना उत्तर देताना जॅस्मिनने उपरोधिक शब्दांत लिहिलं की, प्रत्येक वेळी तिचा चेहरा थोडा वेगळा दिसला की लोकांना वाटतं तिने आणखी एक प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिने पुढे स्पष्ट केलं की, सतत प्रवास करणं, पुरेशी झोप न मिळणं, वेगवेगळ्या मेकअप आर्टिस्टसोबत काम करणं, सायनसमधील सूज आणि थकवा अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्यात बदल दिसू शकतो. तिने स्ट्रेंथ ट्रेनिंगही सुरू केलं असून तिचं थोडं वजन वाढलं आहे.

3 / 5
काही दिवस चेहरा अधिक शार्प दिसतो, तर काही दिवस सुजलेला किंवा थकलेला दिसतो. कधीकधी मेकअपही नीट होत नाही, असं सांगत तिने ट्रोलर्सना शांत राहण्याचा सल्ला दिला. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठीही वेळ लागतो, असा टोमणाही तिने मारला. या पोस्टमध्ये जॅस्मिनने स्वतःच्या शरीराविषयी आणि आत्मविश्वासाविषयीही भाष्य केलं. ती म्हणाली की, ती रक्त, मांस, स्नायू आणि हाडांनी बनलेली एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी सारखंच दिसण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. वेगवेगळ्या दिवशी वेगळं दिसण्याचा तिलाही अधिकार आहे.

4 / 5
'मला माझा चेहरा आवडतो, माझं शरीर आवडतं आणि माझं स्वतःवर प्रेम आहे. आनंदी राहण्यासाठी मला दररोज परफेक्ट दिसण्याची गरज नाही. कृपया या माणसाला मोकळा श्वास घेऊ द्या', अशा आशयाचं उत्तर तिने दिलं. दरम्यान, जॅस्मिन भसीनने 'दिल से दिल तक', 'टशन-ए-इश्क' यांसारख्या मालिकांमधून लोकप्रियता मिळवली. 'बिग बॉस 14'मधील सहभागामुळेही ती चर्चेत आली होती.

5 / 5
Follow Us
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी....
Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद