AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 लाख रेट फिक्स केलं अन्..; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत प्रायव्हेट इव्हेंटच्या नावाखाली घडला धक्कादायक प्रकार

'बिदाई' फेम अभिनेता अंगद हसीजाला एका प्रायव्हेट इव्हेंटसाठी 16 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, कार्यक्रमामागचा उद्देश समजल्यानंतर त्याने पैसे परत केले.

| Updated on: Nov 25, 2026 | 9:22 AM
Share
टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता अंगद हसीजा सध्या एका धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आला आहे. 'बिदाई' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंगदला एकदा प्रायव्हेट इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी त्याला तब्बल 15 ते 16 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रमामागचा खरा उद्देश समजल्यानंतर अभिनेत्याला मोठा धक्का बसला.

1 / 5
त्याने तातडीने पैसे परत केले आणि कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अंगदने आयुष्यातील हा विचित्र अनुभव सांगितला आहे. त्याने सांगितलं की, करिअरच्या एका टप्प्यावर त्याला देश-विदेशातील अनेक कार्यक्रमांसाठी बोलावलं जायचं. अशाच एका कार्यक्रमासाठी त्याला फोन आला होता. मात्र कार्यक्रम नेमका कुठे आहे, तिथे काय करायचं आहे आणि त्याच्याकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा आहे, याबाबत सुरुवातीला कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती.

2 / 5
अंगदने आयोजकांना कार्यक्रमात नेमकं काय करायचं आहे, डान्स करायचा आहे का, कपडे कसे असतील, असे प्रश्न विचारले. त्यावर समोरच्या व्यक्तीने हा एक प्रायव्हेट इव्हेंट असल्याचं सांगितलं. सुरुवातीला अंगदला हा एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा छोटेखानी पार्टी असावी, असं वाटलं. या कार्यक्रमासाठी अंगदला 15 ते 16 लाख रुपयांची मोठी रक्कम देण्याची तयारी आयोजकांनी दाखवली. त्यावेळी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अंगदला इतके पैसे मिळत नव्हते. त्यामुळे एवढी मोठी रक्कम ऐकून तो आश्चर्यचकित झाला. त्याला या ऑफरमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला.

3 / 5
आयोजकांकडून वारंवार कार्यक्रमाला येण्याबाबत विचारणा केली जात होती. काही अडचण तर नाही ना, असंही त्याला विचारण्यात आलं. त्यामुळे अंगदने कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देण्याच आग्रह धरला. तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्याला, 'सर, तुम्हाला माहीतच असेल. सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही पेड आहात', असं उत्तर दिलं. हे ऐकून अंगदला मोठा धक्का बसला. त्याच्या नावावर अशा प्रकारचा व्यवहार केला जात असल्याचं त्याला समजलं. विशेष म्हणजे, अंगदने कार्यक्रमाला होकार देण्याआधीच त्याच्या खात्यात 16 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते.

4 / 5
या प्रकारानंतर अंगदने क्षणाचाही विलंब न करता पैसे परत केले आणि कार्यक्रमाला जाण्यास स्पष्ट नकार दिला. या संपूर्ण अनुभवामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. या फोन कॉलमुळे बराच काळ त्याला तणाव जाणवत होता. अंगदने सांगितलं की, या सगळ्या प्रकारामुळे त्याला खूप लाजिरवाणं वाटलं. समोरच्या व्यक्तीने सर्व कलाकार अशा प्रकारे पैसे घेतात आणि हे सामान्य असल्याचं सांगण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, अंगदने अशा प्रकारच्या व्यवहारापासून स्वतःला दूर ठेवलं.

5 / 5
Follow Us
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध