AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीतरी मोठी फसवणूक कर… अभिजीत दिपके यांनी दिला थेट सहकाऱ्याला मोठा सल्ला, दिल्लीत..

साैरभ दास याला लंडनला जाण्यापासून रोखल्यानंतर सीजेपी आक्रमक भूमिका घेत आहे. त्यातच आता अभिजीत दिपके यांनी मोठा सल्ला दिला. 2029 मध्ये याच सरकारने पासपोर्ट दिला आणि आता यांना पासपोर्टमध्ये घोळ कसा दिसू शकतो, असे दिपकेंनी म्हटले.

काहीतरी मोठी फसवणूक कर... अभिजीत दिपके यांनी दिला थेट सहकाऱ्याला मोठा सल्ला, दिल्लीत..
Abhijeet Deepke
| Updated on: Nov 25, 2026 | 8:49 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन पुकारले. त्यांच्या या आंदोलनाला इतका मोठा प्रतिसाद मिळाला की, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले पण त्यांना यश मिळाले नाही. त्यातच साैरभ दास हा एका व्याख्यानासाठी लंडनला निघाला होता. पण दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. पासपोर्टमध्ये काही समस्या असल्याचे कारण दिले. यादरम्यान रागात साैरभ दास याने दिल्ली विमानतळाहूनच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपला राग व्यक्त केला. यादरम्यान अभिजीत दिपके यांनीही यावर संताप व्यक्त केला. अभिजीत दिपके यांनी थेट म्हटले की, नीरव मोदी, विजय माल्या यांच्यासारखी मोठी फसवणूक साैरभ दास याने करायला हवी होती.

साैरभ दासला सल्ला देत अभिजीत दिपके यांनी विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्यासारखी काहीतरी मोठी फसवणूक तू कर असाच सल्ला साैरभ दासला दिला. लंडनधील ऑक्सपोर्ड विद्यापाठीत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी साैरभ दासला बोलावण्यात आले होते. रात्री 1 वाजता त्याची लंडनला जाणारी फ्लाईट होती. मात्र, इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी रोखले.

दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले की, आम्हाला या प्रकरणाबद्दल काही माहिती नाही. यावर अभिजीत दिपके यांनी म्हटले की, 2019 मध्ये याच सरकारने साैरभ दास याचा पासपोर्ट मंजूर केला. आता सात वर्षानंतर त्याच्या पासपोर्टमध्ये नक्की काय घोळ झाला? विजय माल्या याने 9 कोटीची फसवणूक केली. नीरव मोदी याने 6 हजार 498 कोटीची फसवणूक केली.

हे फसवणूक करून देश सोडून पळून गेले. साैरभ दास भाई तुलाही आता असे काही करावे लागेल. साैरभ दास याने भ्रष्टाचार किंवा अशी फसवणूक केली असतील तर त्याला लंडनला जाण्यापासून कोणी रोखले नसते. साैरभ दासला लंडनला जाण्यापासून रोखल्यानंतर सीजेपी आपला संताप व्यक्त करत आहे. त्यांच्या सर्वच नेत्यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Follow Us
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर