AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुन्या रेल्वे डब्यांचं काय होतं? खराब झालेले डब्बे करून देतात रेल्वेला कोट्यवधींची कमाई!

रेल्वेचे डबे साधारण 25 ते 30 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतात. मात्र, त्यानंतरही त्यांचा प्रवास संपत नाही. यातून रेल्वेला अतिरिक्त उत्पन्नही मिळतं.

| Updated on: Nov 25, 2026 | 8:19 AM
Share
भंगार विक्रीतून रेल्वेला कोट्यवधींचं उत्पन्न: रेल्वेचे बहुतांश जुने डबे निवृत्त झाल्यानंतर कंडमेशन यार्डमध्ये पाठवले जातात. येथे डब्यांचे सुस्थितीतील आणि उपयोगी भाग वेगळे काढले जातात. उर्वरित डबे गॅस कटरच्या मदतीने कापून भंगार म्हणून लिलावात विकले जातात.

1 / 6
एका डब्याच्या विक्रीतून मिळतात लाखो रुपये: मध्य रेल्वेने एप्रिल 2022 ते जून 2023 या काळात 138 मेल आणि एक्स्प्रेस डबे निवृत्त केले. या डब्यांच्या विक्रीतून रेल्वेला तब्बल 17.58 कोटी रुपये मिळाले. म्हणजेच एका डब्यामागे सरासरी 12.73 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.

2 / 6
जुन्या डब्यांचं बनतंय 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स': चांगल्या स्थितीत असलेल्या जुन्या डब्यांचं आकर्षक रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केलं जातं. फेब्रुवारी 2022 मध्ये नागपूर रेल्वे स्थानकावर पहिलं 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरू झालं. हे रेस्टॉरंट हल्दीरामकडून चालवलं जातं. अशा उपक्रमांमुळे रेल्वेला तिकीट विक्रीव्यतिरिक्त उत्पन्न मिळतं.

3 / 6
 अनेक शहरांमध्ये सुरू आहेत रेल्वे कोच रेस्टॉरंट:  नागपूरनंतर चेन्नई, मुंबई, भोपाळ, जबलपूर आणि इतर शहरांमध्येही जुन्या डब्यांमध्ये रेस्टॉरंट सुरू करण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे दोन जुन्या MEMU डब्यांपासून 'चाय चुन' आणि 'वाओ भोजन' ही खाद्यपेयांची ठिकाणं तयार करण्यात आली आहेत. काही ठिकाणी रेल्वे पाच वर्षांच्या लीजवर जागाही उपलब्ध करून देते.

4 / 6
 पर्यटकांसाठी बनतात कॅम्पिंग कोच: जुन्या डब्यांचा वापर केवळ रेस्टॉरंटसाठीच नाही, तर पर्यटनासाठीही केला जातो. सुस्थितीतील डब्यांचं कॅम्पिंग कोचमध्ये रूपांतर करून पर्यटकांना वेगळा अनुभव दिला जातो. याशिवाय काही डबे ऑटोमोबाइल वाहतूक आणि अपघात निवारण गाड्यांसारख्या कामांसाठीही वापरले जातात.

5 / 6
काही डबे बनतात रेल्वेच्या इतिहासाचा ठेवा: काही जुन्या डब्यांना ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे त्यांचं भंगारात रूपांतर केलं जात नाही. अशा डब्यांचं जतन करून त्यांना रेल्वे म्युझियममध्ये ठेवण्यात येतं. मुंबई, हावडा आणि शिमला यांसारख्या ठिकाणी जुने डबे, सॅलून आणि क्रेन जतन करण्यात आले आहेत. हावड्याच्या प्रादेशिक रेल्वे संग्रहालयात देशातील सुरुवातीच्या मेट्रो कोचपैकी एक कोचही पाहायला मिळतो.

6 / 6
Follow Us
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक