Karnataka Hijab| शैक्षणिक संस्थेत रिकाम्या पोलवर भगवा फडकवला, जय श्रीरामचा नारा !

व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिमोगा येथील असल्याचा दावा केला जात आहे. कर्नाटकात उफाळून आलेल्या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ सोशल मीडियावरून फिरत आहे.

Karnataka Hijab| शैक्षणिक संस्थेत रिकाम्या पोलवर भगवा फडकवला, जय श्रीरामचा नारा !
व्हायरल व्हिडिओतील क्षणचित्र
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 3:28 PM

बंगळुरूः  कर्नाटकमध्ये हिजाब (Karnatak Hijab) घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारल्याच्या घटनेनंतर विविध प्रकारचे व्हिडिओ (Viral Video) समोर येत आहेत.  हा व्हिडिओ शिमोगा (Shimoga) शहरातील असल्याचे उघड झाले आहे. या शहरातील गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेजमधील असल्याची माहिती उघड झाली आहे. या व्हिडिओत एक जण खांबावर चढून भगवा ध्वज फडकावतो असे दिसतेय. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा खांबावर चढून भगवा ध्वज फडकावतो आणि खाली उभे असलेले विद्यार्थी जय श्रीरामचा नारा लगावत आहेत.

शिमोग्यातील कॉलेजमधील व्हिडिओ

दरम्यान, शिमोग्यातील गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेजमधील हा व्हिडिओ असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बी. आर. यांनी स्पष्ट केले. ही घटना घडली तेव्हा मी तिथेच उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. हे विद्यार्थी खांबावर चढले तेव्हा खांबावर कोणताही झेंडा नव्हता. हा पोल रिकामा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तिरंगा काढला, असा दावा सोशल मीडियावरून केला जात होता, मात्र तो असत्य असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. तसेच काही वेळातच हा भगवा देखील खाली काढण्यात आला होता.

हिजाबचा वाद काय आहे?

साधारण 23 दिवसांपूर्वी हा वाद सुरु झाला. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी सांगितले की, हा वाद सुरु होण्यापूर्वी या महाविद्यालयात येमाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होत आहे.

डिस्क्लेमर : सदर वृत्तात यापूर्वी शैक्षणिक संस्थेवरील पोलवरुन तिरंगा हटवून भगवा फडकावला असे लिहिण्यात आले होते. मात्र फेसबुकच्या फॅक्ट क्रेसेंडोनी निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर मजकूरात बदल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

महागाईचा आणखी एक झटका; ‘उबेर’ नंतर आता ‘ओला’नेही वाढवले भाडे; भाड्यात 16 टक्क्यांपर्यंत वाढ

‘मुस्लिमांना शांततेत आणि सन्मानाने जगू द्या’, कर्नाटक भाजपमधून मुस्लिमांप्रती प्रेम आलं उफाळून

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.