LS Election 2024 phase 2 : महाराष्ट्रात किती मतदारसंघात मतदान? कुठल्या भागात शाळा-कॉलेजेस बंद?

| Updated on: Apr 26, 2024 | 9:43 AM

LS Election 2024 phase 2 : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे. 26 एप्रिलला आज दुसऱ्या टप्प्याच मतदान होत आहे. महाराष्ट्रातील कुठल्या मतदारसंघात मतदान होत आहे? देशात एकूण किती जागांसाठी मतदान सुरु आहे? त्या बद्दल जाणून घ्या.

LS Election 2024 phase 2 : महाराष्ट्रात किती मतदारसंघात मतदान? कुठल्या भागात शाळा-कॉलेजेस बंद?
दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे.
Follow us on

देशात 18 व्या लोकसभा निवडणुकीला 21 एप्रिलला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 21 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान झालं. जवळपास 64 टक्के मतदान झालं. अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार बेट, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी या भागात मतदान झालं.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार लोकसभेवर जातात. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडणार आहे. 19 एप्रिलच मतदान झालं. आज 26 एप्रिलला मतदान होत आहे, त्यानंतर 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कुठे मतदान झालं

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, .चंद्रपूर,

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात कुठे मतदान सुरु आहे?

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी,

विदर्भात 6 आणि मराठवाड्यात 2 मतदारसंघात मतदान 

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.

महाराष्ट्रात ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे, तिथे शाळा-कॉलेजेस बंद असतील.

देशात किती राज्यात होणार मतदान ?

दुसऱ्या टप्प्यात देशात एकूण 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या भागात मतदान सुरुआहे.