काकाच्या घरात दागिन्यांची चोरी करून घेतली आलिशान ‘THAR’, अन् काकालाच पुजेला बोलावलं, पुतण्याचा प्रताप असा उघडकीस आला

पोलीस उपधिक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस ठाण्याचे हवालदार युवराज पाटील, बाबासो कीटे पोलीस कॉन्स्टेबल महेश कदम ,अमोल चव्हाण आणि महेश शिंदे यांनी या तपास करुन हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

काकाच्या घरात दागिन्यांची चोरी करून घेतली आलिशान THAR, अन् काकालाच पुजेला बोलावलं,  पुतण्याचा प्रताप असा उघडकीस आला
THAR CHORI
| Updated on: Oct 23, 2026 | 9:23 PM

हल्लीचा शानशौकीसाठी रिकामटेकडे तरुण काय करतील याचा नेम नाही. शॉर्टकटने पैसा कमवायचा आणि आलिशान जीवन जगायचे हे तर प्रत्येक तरुणाचे स्वप्न जणू बनले आहे. मात्र, त्यासाठी मेहनत करायला या तरुणांना वेळ नाही. सर्वकाही झटपट हवे. अशाच एक विचित्र प्रकार घडला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळ्यातील सातवे येथे एका १९ वर्षांच्या तरुणाने स्वत:च्या चुलत चुलत्याच्या घरातच १५ तोळे सोन्याची चोरी केली, आणि त्या पैशातून थार कार विकत घेतली आणि वर या कारच्या पूजेला त्याच काकांना बोलावले.

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे समर पोपट चव्हाण ( वय १९ ) त्याच्या कुटुंबीयासहित राहतो.त्याच्याजवळ चुलत चुलते उमेश मारुती चव्हाण राहतात. त्यांच्या घरातून समर चव्हाण याने साधारणपणे एक महिन्यापूर्वी १५ तोळे सोन्याचे दागिने चोरले होते.चोरलेले दागिने गावातीलच सोनार संग्राम बाबासो मोरे याच्याशी संगनमत करुन त्याने दहा लाख रुपये किमतीला विकले आणि या दहा लाखातून चक्क महिंद्राची ‘थार’ कार खरेदी केली.

Loading...

नवी कोरी थार घरी आणल्यानंतर या कारच्या पूजेसाठी त्याने काका उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रण दिले. पूजेला जाताना उमेश चव्हाण आणि त्याच्या घरच्यांनी अंगावर घालण्यासाठी दागिन्याच्या शोधाशोध केली असता ज्या ठिकाणी दागिने ठेवले होते, त्या ठिकाणी दागिनेच नव्हते. त्यामुळे दागिने चोरीला गेल्याचे कळल्याने त्यांना मोठा धक्का बसला. यावेळी परंतू तिथे एक आश्चर्याची बाब उघडकीस आली. त्याच कपाटात बाजूला ठेवलेले आजीचे दागिने मात्र चोरीला गेले नव्हते. केवळ उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचेच दागिने चोरीला गेले होते.

यावरून चोर हा जवळचाच किंवा घरचाच असावा अशी शंका उमेश चव्हाण यांना आली. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर उमेश चव्हाण याच्या पुतण्या समर चव्हाण याच्याकडे अचानक नवीन कार कोठून खरेदी केली ? त्यासाठी पैसे कुठून आले ? याची चौकशी केली असता समर चव्हाण यांनीच चोरी केल्याची कबूली कोडोली पोलिसांनी दिली. त्यानुसार कोडोली पोलिसांनी प्रत्यक्षात चोरी करणारा समर चव्हाण आणि त्याची चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार संग्राम मोरे या दोघांनाही ताब्यात घेतले. आता त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करण्याचे तसेच पुढील तपास करण्याचे काम सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us