उद्धव ठाकरेंना सत्तेवर असताना शहाणपण सुचलं नाही, भाजप खासदाराची सडकून टीका

| Updated on: Nov 27, 2022 | 5:28 PM

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलेले आवाहन आणि भाजपवर, शिंदे गटावर केलेल्या टीकेमुळे भाजपच्या नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. 

उद्धव ठाकरेंना सत्तेवर असताना शहाणपण सुचलं नाही, भाजप खासदाराची सडकून टीका
Follow us on

जळगावः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार टीका केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून आणि भाजपच्या नेत्यांकडूनही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. कामाख्या देवीचं दर्शन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी भविष्य बघणाऱ्याला दाखवलेल्या हातावरून उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. स्वतःचं भविष्य माहिती नसलेल्या नेत्यांना लोकांचं भविष्य काय कळणार असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली होती.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना अश्वासन दिल्यानंतर भाजपच्या उन्मेश पाटील यांनी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना उन्मेश पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशातील परिस्थिती आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना अश्वासन देणे वगैरे हे भूलथापा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली अश्वासंन आणि तसेच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणे बंद करावं असा टोलाही त्यांनी लगावला होता.

सत्तेत असताना उद्धव ठाकरे, अजित पवार यांना शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकू आली नाही असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही निशाण साधला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि भाजपच्या या वक्तव्यावरून हे वातावरण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलेले आवाहन आणि भाजपवर, शिंदे गटावर केलेल्या टीकेमुळे भाजपच्या नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या दौऱ्यामुळे आणि शेतकऱ्यांबरोबर साधलेल्या संवादामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आताच शेतकऱ्यांना अश्वासनं का दिली जात आहेत असाही सवाल त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांनी वीज बिलं भरलेली नाहीत म्हणून त्यांनी वीज कनेक्शन तोडली होती. त्यावेळी ही संवदेनशीलता का दाखवण्यात आली नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर मात्र कोणत्याही शेतकऱ्याची कनेक्शन तोडली जात नाही असंही उन्मेश पाटील यांनी सांगितले.