जळगाव दूध संघांचं प्रकरणामुळे एकनाथ खडसेंची डोकेदुखी वाढणार; गैरव्यवहारप्रकरणी शासनाकडून आता चौकशी समिती गठीत

| Updated on: Jul 28, 2022 | 7:15 PM

दूध संघात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचारी नागराज जनार्दन पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यामुळे जर्नादन पाटील यांच्या यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आल्याचेही सांगम्यात आले आहेत.

जळगाव दूध संघांचं प्रकरणामुळे एकनाथ खडसेंची डोकेदुखी वाढणार; गैरव्यवहारप्रकरणी शासनाकडून आता चौकशी समिती गठीत
Follow us on

जळगावः जळगाव जिल्हा दुध संघातील (Jalgaon District Dudh Sangh) कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या (Fraud Case) चौकशीसाठी शासनाकडून आता चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी दिले आहेत. चौकशी समितीत 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 20 ऑगस्ट पर्यंत चौकशी करून तो अहवाल राज्य शासनाला देण्याचे आदेश दिले गेले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Shinde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

दूध संघात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचारी नागराज जनार्दन पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यामुळे जर्नादन पाटील यांच्या यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आल्याचेही सांगम्यात आले आहेत.

नागराज पाटील यांचे आरोप

दूध संघाच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार नागराज पाटील यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. नागराज पाटील यांनी दूध संघावर गंभीर आरोप केले होते.

कागदपत्र जाळल्याचाही आरोप

यामध्ये दूध संघाची जुनी कागदपत्रे जाळण्यात आली होती, असाही आरोप करण्यात आला होता. नागराज पाटील यांच्या या आरोपामुळे मात्र राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

अडचणीत होणार वाढ

मागील 2020 मध्येही जळगाव दूध संघावर गंभीर आरोप करुन कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी 3 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे शासनाने आता चौकशी समिती गठीत केली असल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे वर्तवली जात आहे.