एकनाथ खडसेंची कोंडी; जळगाव दूध संघावर आता ‘प्रशासक’; चौकशी समितीत गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक

| Updated on: Jul 29, 2022 | 10:56 PM

एकनाथ खडसे यांची पत्नी अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील कारभाराविषयी तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे सरकारकडून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले आहे.

एकनाथ खडसेंची कोंडी; जळगाव दूध संघावर आता प्रशासक; चौकशी समितीत गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक
Follow us on

जळगावः जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचं (Jalgaon Dudh Sangh) राजकारण आता प्रचंड तापलं आहे. सरकारकडून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केल्यानंतर काही तासांनी प्रशासक मंडळाने दूध संघाचा रात्रीच घेतला ताबा आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणाला आता वेगळे वळण लागणार असून त्याचा ताप खरा हा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadase) होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या दूध संघावर प्रशासक नियुक्त (Administrator Appointed) करण्यात आल्याने एकनाथ खडसेंना हा जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे एकनाथ खडसे यांची पत्नी दूध संघावर अध्यक्ष म्हणून होत्या आता प्रशासक नियुक्तीनंतर अध्यक्ष मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. आता या चौकशी समितीमध्ये गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मंदाताई खडसेंचे संचालक मंडळ बरखास्त

एकनाथ खडसे यांची पत्नी अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील कारभाराविषयी तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे सरकारकडून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करुन आता जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे सरकारचा हा निर्णय डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

कर्मचारी भरतीत घोटाळा

जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता तसेच या दूध संघात राबविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी सरकारकडे केली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. मात्र शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ त्यावर 5 जणांची चौकशी समिती नेमून चौकशीला सुरुवात करण्यात आली तर एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आणि संघावर आता प्रशासक नियुक्त करण्यात आला.

चौकशी समितीत महाजनांचे स्वीय सहाय्यक

शिंदे फडणवीस सरकारने प्रशासक नियुक्त केले गेले आहेत, त्यामध्ये 11 जणांचा समावेश असून त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांचा समावेश आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, भाजप आमदार मंगश चव्हाण, अजय एकनाथ भोळे, आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद भगवान देशमुख, राजेंद्र वाडीलाल राठोड, अशोक नामदेव कांडेलकर, गजानन पुंडलिक पाटील, अमोल पंडितराव शिंदे, विकास पंडित पाटील यांचा समावेश आहे.
सरकारकडून जळगाव जिल्हा दूध संघावर आता प्रशासक नेमण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातील आणि एकनाथ खडसे यांची राजकीय गणितं बदलणार असल्याचेही बोलले जात आहे.