Sharad Pawar Live : फडणवीसांनी 14 ट्विट करत पवारांना घेरलं पण पवारांनी हसत हसत एका शब्दात निकाल लावला

| Updated on: Apr 15, 2022 | 5:27 PM

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडेच होते. त्यानंतर मधुकर पिचड यांच्याकडे होतं. अरुण गुजराती, सुनील तटकरे ही सर्व नाव वेगवेगळ्या समाजातील आहेत. तसेच समाजातील सर्व घटकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. पक्षाची नीती एका जातीची नाही हेही त्यांनी सांगितले.

Sharad Pawar Live : फडणवीसांनी 14 ट्विट करत पवारांना घेरलं पण पवारांनी हसत हसत एका शब्दात निकाल लावला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार
Image Credit source: TV9
Follow us on

जळगावः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या देवेंद्र फडणवीस, बाबासाहेब पुरंदरे, शिवजयंती आणि आघाडी सरकारविषयी विचारलेल्या त्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा त्यांनी पुरावे, दाखले देऊन खरपूस समाचार घेतला. या पत्रकार परिषदेत त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एकाच वाक्यात देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या 14 ट्विट (Twits) केल्याच्या गोष्टीवर त्यांना छेडले असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ट्विटसचा आनंद घेतो असे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मला काही समजत नाही. जातीयवाद माझ्या नावावर का टाकला जातो आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करुन शरद पवार आणि राज्य सरकारला वेगवेगळे प्रश्न विचारले होते. त्यांच्या ट्विटनंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

पक्षाची नीती एका जातीची नाही

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडेच होते. त्यानंतर मधुकर पिचड यांच्याकडे होतं. अरुण गुजराती, सुनील तटकरे ही सर्व नाव वेगवेगळ्या समाजातील आहेत. तसेच समाजातील सर्व घटकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. पक्षाची नीती एका जातीची नाही हेही त्यांनी सांगितले. तसेत त्यांना दुसरा काही रोजगार नाही त्यामुळे असा आरोप करत असतात असे म्हणून त्यांनी विरोधकांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला.

वीज प्रश्नावर राज्य सरकार गंभीर

शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर असताना त्यांना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी त्यांना विजेचा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, विजेच्या प्रश्नांकडे राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही निशाना साधला. केंद्र सरकार आपल्या सत्येचा दुरुपयोग करत असून, जे सत्येत नाहीत त्यांनी काही तरी निर्णय घेण्याचे प्रकार राजकारणात वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुरंदरेंचा माफीनामा

शरद पवार हे शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आज पुन्हा शरद पवार यांना जेम्स लेन प्रकरणावर पत्रकारांनी सवाल उपस्थित केल्यानंतर त्यांनी जेम्स लेनच्या पुस्तकांपासून ते बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले त्यांच्या कौतुकापर्यंतचा सगळा प्रवास त्यांनी पुराव्यानिशी मांडला. जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक उताराही त्यांनी वाचून दाखवल. त्यानंतर झालेल्या वैचारिक वादानंतर बाबासाहेब पुरंदरे यांनी माफीनामा जाहीर केल होता हेही त्यांनी सांगितले.

ऐक्याची भूमिका

मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंर आपण स्वतः मुख्यमंत्री असताना काय भूमिका घेतली होती. याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. यावेळी त्यांनी सांगितले की, महमद अली याचं नाव घेतले नसते तर राज्य पेटले असते असंही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

NCP Rupali Patil : ‘राज ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे, कायदा हातात घेणाऱ्यांवर होणार कारवाई’; रुपाली पाटील यांचे मनसेला टोले

Sharad Pawar Live : त्यांच्याकडे बोलायला काही नाही, शरद पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीतल्या ओबीसी, आदिवासी नेत्यांची यादी वाचली, फडणवीस बोलणार?

Onion : नादच केलाय ग्रेट!! कांद्याचे एकरी उत्पन्न पाहून खुद्द कुलगुरूच पोहोचले बांधावर, अहमदनगरच्या शेतकऱ्याची Success Story