मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असताना सरकारचा सर्वात मोठा निर्णय, कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग होणार सुकर

मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असताना सरकारचा सर्वात मोठा निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे. यंदा कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग सुकर होणार आहे. दुसरीकडे जरांगे यांच्या सहकाऱ्याने आंदोलन परवानगीसाठी मुंबई पोलिसांना पत्र दिलं आहे.

मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असताना सरकारचा सर्वात मोठा निर्णय, कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग होणार सुकर
manoj Jarange news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 9:55 AM

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कुणबी जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचे समोर आलं आहे. आता जिल्ह्यातील 62 महसूल मंडळांमध्ये शिबीर घेऊन नोंदीचीही शोध घेणार आहे. तर तक्रारीचा निपटारा करण्यासाठी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून करण्यात नियुक्ती आली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेऊन गेल्यानंतर प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं निर्णयाक आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज शनिवारी आठवा दिवस आहे. तर दुसरीकडे जालना जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलाय. जिल्हा प्रशासनाने कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष शिबिरांची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी नागरिकांना जुन्या नोंदी व आवश्यक कागदपत्रांसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नये त्यासाठी जालना जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातील एकूण 62 मंडळामध्ये 16 सप्टेंबरपर्यंत शिबिरे घेतली जाणार आहे. तर तक्रार निराकरणासाठी प्रशासनाकडून नोडल अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

आता तक्रारींचा रोज आढावा घेणे, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोबत समन्वय साधने,प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. तत्पूर्वी, या सगळ्या संदर्भामध्ये संपर्कासाठी 9545451005 हा क्रमांक देखील उपलब्ध करून दिलाय.

मराठा विद्यार्थ्यांसाठी सराकारचा मोठा निर्णय

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता सारथी योजनेअंतर्गत परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाने मराठा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत बदल करण्यात आलेत. या शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणलीये. त्यामुळे आता शैक्षणिक संस्थेचे शुल्क आता संबंधित संबंधित यंत्रणेकडून थेट संस्थेला देण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे.

जरांगेंचं आंदोलन लवकरच मुंबईत

मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी मुंबई पोलीसांना नवे पत्र दिलं आहे. त्यामुळे लवकरच मुंबईत आंदोलन होण्यासाठी शक्यता आहे. खरंतर याआधीच आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनासाठीच्या परवानगीकरिता अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर आणखी एक नवा अर्ज जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी मुंबई पोलीसांना दिला आहे. सध्या अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असून मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच मुंबईत येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलंय. परंतु आंदोलनाची तारीख लवकरच कळवू असंही पत्रात नमूद केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us