दुश्मनाच्या बर्थडेला का गेला?… तरुणाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

कल्याणमध्ये वाढदिवसाच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. 'माझ्या दुश्मनाच्या वाढदिवसाला का गेला' असे विचारत मोन्या फुलारी नावाच्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि पत्राने मारले. या घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला असून खडकपाडा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुश्मनाच्या बर्थडेला का गेला?... तरुणाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; VIDEO व्हायरल
भररस्त्यात तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
| Updated on: May 27, 2026 | 2:55 PM

लोक कशाचा राग कशावर काढतील याचा काही नेम नसतो. आपण एखाद्याशी बोलत नाही, म्हणून इतरांनीही त्याच्याशी बोलू नये किंवा संबंध ठेवू नये असं काही लोकांना वाटत असतं. त्यांच्या मनात एखाद्या बद्दलचा पराकोटीचा द्वेष निर्माण झाल्यावर अशा प्रकारची भावना निर्माण होते. पण प्रत्येकजण स्वतंत्र आहे, प्रत्येक व्यक्तीचं एक जग आहे. तो त्याच्या मनाप्रमाणे किंवा मर्जीप्रमाणे वागू शकतो, हे या लोकांच्या गावीच नसतं. ते इतरांवर अधिकार गाजवायला जातात आणि त्यातूनच वादाला फोडणी बसते. कल्याणमध्ये असाच काहीसा प्रकार घडलाय. माझ्या दुश्मनाच्या बर्थडेला का गेला म्हणत दोन चार जणाने एका मित्राला भयानक मारहाण केली. त्यात हा व्यक्ती जखमी झाला आहे.

कल्याणच्या मोहने येथील लहुजी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून तरुणांमध्ये तुफान राडा झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत असून असं कोणी वागतं का? इतकं कोणी मारतं का? अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. तसेच मारहाण करणाऱ्यांना अद्दल घडवण्याची मागणीही होत आहे.

मोन्याला लाथाबुक्क्याने मारहाण

मोन्या फुलारी या तरुणाला भावड्या, बाब्या आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. तू आमच्या दुश्मनाच्या वाढदिवसाला का गेला? असा जाब विचारत आरोपींनी मोन्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर मारहाणी दरम्यान या तिघाचौघांनी मोन्याच्या डोक्यावर पत्रे मारून त्याला गंभीर दुखापत केली.

सोशल मीडियावर व्हिडिओ

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ परिसरातील एका मुलीने मोबाईलमध्ये शूट केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे मोहने पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा राडा झाला असून खडकपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तरूणाला मारहाण 

व्हिडीओत काय ?

रात्रीची ही घटना असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. तीनचार जण एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या तरुणाला भररस्त्यात जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात आहे. तर जीव वाचवण्यासाठी हा तरुण ढोरासारखा ओरडत आहे. ढसाढसा रडतानाही दिसत आहे. धायमोकलून रडणाऱ्या आणि किंचाळणाऱ्या या तरुणाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. त्यानंतर या तरुणांनी मोन्याच्या डोक्यात पत्रे मारल्याचंही दिसून येत आहे. व्हिडीओतील मोन्याचा आकांत जीवघेणा असून हा व्हिडीओ पाहिल्यावर काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us