लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?

स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी नुकताच लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ माजली आहे.

लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
Karuna Munde and Ashok Kharat
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 11, 2026 | 1:29 PM

सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसते. अशोक खरातवर आतापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल झाले आहेत. आता प्रकरणावर स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यांनी थेट सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या, “घरात प्रकरण इतके मोठे आहे की, रुपाली चाकणकर यांची सुनेत्राताई पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करायला पाहिजे होती. रुपाली चाकणकर यांचे खरातसोबत संबंध असल्याचे उघड होत आहे. त्यांचीही चौकशी व्हायला हवी. त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे पैशाचे ट्रान्झेक्शनही आहेत. या संपूर्ण प्रकरणात सुनेत्रा पवार यांनी राजीनामा घ्यायला हवा. खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सह-आरोपी करावे.”

करुणा मुंडे पुढे म्हणाल्या, “जर जीवाला धोका असेल तर हकालपट्टी का केली नाही? खरातचा जेलमध्ये एपस्टिनसारखा मर्डर होऊ शकतो. त्याला अनेक मोठी नावे माहीत आहेत. त्यामुळे तो जेलमध्ये मारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

सुप्रिया सुळेंची घेणार भेट

राहुरी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, “राहुरीत निवडणूक आहे की नाही हे मला माहिती नाही. मी सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार आहे. त्यांच्याकडे आशीर्वाद मागणार आहे.”

नाना पटोले यांच्या ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’ या विधानावर करुणा मुंडे म्हणाल्या, “नाना पटोले म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत, मग तुम्ही इतके दिवस त्यांच्यासोबत का राहिलात? आधीच वेगळं व्हायला पाहिजे होतं.”

Follow Us