Gokul President Election : गोकुळच्या नव्या अध्यक्षांची निवड होण्याआधी सतेज पाटील यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Gokul President Election : लवकरच गोकुळ दूध संघाच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. नुकताच गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. कोल्हापुरात गोकुळची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते.

Gokul President Election : गोकुळच्या नव्या अध्यक्षांची निवड होण्याआधी सतेज पाटील यांनी घेतला महत्वाचा निर्णय
Gokul Election 2026
| Updated on: Oct 24, 2026 | 9:26 AM

भूषण पाटील, प्रतिनिधी : कोल्हापुरात गोकुळ दूध महासंघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. नुकताच या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सगळ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी 14 संचालकांची गरज आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे 13 संचालक आहेत, तर महायुतीकडे 12 संचालक आहेत. यामुळे अध्यक्ष निवडीत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात फक्त एका जागेचं अंतर आहे. सध्या राज्यात, केंद्रात महायुतीचं सरकार आहे, त्यांचा दबदबा आहे. अशावेळी फोडाफोडीची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून गोकुळ दूध संघ अध्यक्ष निवडी आधी सावध हालचाली सुरु झाल्या आहेत. ठराव धारकांनंतर आता निवडून आलेल्या संचालकांना सहलीवर पाठवण्यात आलय. सतेज पाटील यांनी आपल्या गटाच्या 13 नूतन संचालकांना सहलीवर पाठवलं आहे. आप्पाचीवाडी येथे हालसिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन सर्व संचालक सहलीवर गेले आहेत. तर महायुतीच्या संचालकांना देखील सहलीवर पाठवले जाणार आहे.

Loading...

गोकुळच्या नव्या अध्यक्षाची निवड किती तारखेला?

गोकुळ अध्यक्ष निवड साठीचा कोरम पूर्ण होण्यासाठी आहे 14 संचालकांची गरज आहे. मात्र सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे आहेत 13 तर महायुतीकडे आहेत 12 संचालक आहेत. अध्यक्ष निवडी आधी संचालकांची फोडाफोडी होऊ नये यासाठी दोन्ही आघाड्याकडून खबरदारी घेतली जात आहे. येत्या 29 ऑक्टोबर रोजी गोकुळच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे.

कोल्हापूरच्या राजकारणातील ही दोन्ही मोठी घराणी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना पराभवाचा फटका बसला. हसन मुश्रीफ यांचे सुपूत्र नविद मुश्रीफ, खासदार धनजंय महाडिक यांच्या कुटुंबातील सदस्य शौमिका महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोल्हापूरच्या राजकारणातील ही दोन्ही मोठी घराणी आहेत. कोल्हापुरच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. दोनदा शौमिका महाडिक आणि तीन वेळा युवराज पाटील यांची फेरमतमोजणी झाली. या सर्व फेरमतमोजणीनंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गोकुळच्या निवडणुकीतील विजय फक्त प्रतिष्ठेचाच विषय नसतो, तर त्यावर भविष्यातील राजकीय आडाखे ठरवले जातात.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us