एका लग्नातील मोठी गोष्ट: लातूरमध्ये तृतीयपंथियांनी केले कन्यादान, गरीब मुलीच्या लग्नासाठी तृतीयपंथियांचा हातभार

| Updated on: Mar 21, 2022 | 8:04 PM

आपल्या मुलीचं लग्न म्हणून आई वडिल चिंताग्रस्त. मुलीचं कन्यादान करायंच कसं आणि लग्न पार पाडायचं कसं या विंवचनेत हे कुटुंबीय असतानाच लातूर शहरातील तृतीयपंथी प्रिया लातूरकर आणि त्यांचे सहकारी यांनी पूजाच्या कन्यादानाचा खर्च उचलण्याचं ठरवले.

एका लग्नातील मोठी गोष्ट: लातूरमध्ये तृतीयपंथियांनी केले कन्यादान, गरीब मुलीच्या लग्नासाठी तृतीयपंथियांचा हातभार
Latur Marriage
Image Credit source: TV9
Follow us on

लातूरः विवाह (Marriage) म्हटलं की, प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा पणाला लावतो. सध्याच्या जमान्यात लग्नातील अनेक गोष्टीमुळे काही विवाहसोहळे कायमचे आठवणीत राहणारे आहेत. तर दुसरीकडे मात्र लग्न म्हणजे अवघड गोष्ट असते. कधी पैसा आड येतो तर कधी प्रतिष्ठा तर कधी समस्यांचा डोंगर आ वासून समोर उभा राहिलेला असतो. लातूरमध्ये मध्ये एक अनोख्या प्रकारचं लग्न झालेलं बघायला मिळालं, आणि समाजातील एका चांगल्या गोष्टीची ओळख झाली. लातुरमधील (Latur District) मुलीच्या लग्नासाठी चिंतेत सापडलेल्या एका कुटुंबाच्या मदतीला (Help) तृतीयपंथी धावून आले आहेत. तृतीय पंथीयांच्या मदतीमुळे एका हलाखीची परिस्थिती असलेल्या माता-पित्याला आपल्या मुलीचं कन्यादान करणे सुखकर झाले आहे. ज्या वर्गाला समाजात दुय्यम स्थान दिलं जात त्याच वर्गातील तृतीय पंथियांनी एका कुटुंबातील मुलीचे कन्यादान करुन एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

लातूर शहरातल्या माताजी नगर भागात कवाले कुटुंबीय राहतात. या कुटूंबाची परिस्थिती प्रचंड हलाखीची आहे, आर्थिक परिस्थिती कमकुवत. त्यामुळे लग्नाच्या खर्चाची बाब होतीच त्यामुळे हे मुलीच्या लग्नात पैसा नसल्याने लग्न कसं पार पाडायचं या चिंतेत हे कुटुंबीय होते. वधू असलेल्या पूजाची आई एका खानावळीत पोळ्या बनवण्याचे काम करते, तर तिचे वडील मजूर म्हणून काम करतात. त्यामुळे मुलीचं लग्न थाटामाटात करायची हौस असली तरी पैश्याअभावी मात्र या कुटुंबीयांवर मर्यादा येत होत्या.

थाटात लग्न


आपल्या मुलीचं लग्न म्हणून आई वडिल चिंताग्रस्त. मुलीचं कन्यादान करायंच कसं आणि लग्न पार पाडायचं कसं या विंवचनेत हे कुटुंबीय असतानाच लातूर शहरातील तृतीयपंथी प्रिया लातूरकर आणि त्यांचे सहकारी यांनी पूजाच्या कन्यादानाचा खर्च उचलण्याचं ठरवले. मुलीच्या लग्नात काहीही कमी पडता कामा नये यासाठी प्रिया लातूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली.

नवरीच्या आई बाप सुखावले

पुजाचे लग्न मग थाटामाटात व्हावं, मुलगी आनंदानं सासरी जावी म्हणून मग सगळेच जण प्रयत्न करु लागले. पुजाच्या लग्नासाठी अख्या वऱ्हाडाची काळजी घेण्यासाठी तृतीयपंथियांनीच पदर खोचले. पुजाचा विवाह थाटामाटात करण्यासाठी मग लग्नपत्रिका , आहेर, जेवण, बँड या सगळ्यांची जवाबदारी प्रिया लातूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यानी उचलली.
प्रिया लातूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यानी पुजाच्या लग्नाच्या जय्यत तयारी करुन पुजाचं लग्न थाटामाटात लावून दिलं आणि लग्न पार पडलं, मुलगी सासरी नांदायलाही गेली, त्यामुळे आता कवाले कुटुंबीय आता आनंदी आहेत. तर तृतीय पंथी असतानाही एका मुलीचं कन्यादान करता आल्याचा आनंद प्रिया लातूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे.

 

संबंधित बातम्या

सिद्धू, चन्नी, कॅप्टन यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या AAP आमदारांना कॅबिनेटमध्ये स्थान नाही!

पुणे पोलिसांचा पीडितेवर दबाव? चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात, तर महिला आयोगाचे अहवाल सादर करण्याचे आदेश

Indapur | इंदापूर तालुक्यात ‘भाजप’ ला खिंडार ; हर्षवर्धन पाटलांचे कट्टर समर्थक करणार राष्ट्रवादीत प्रवेश, 3 एप्रिलला होणार पक्ष प्रवेश