AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पोलिसांचा पीडितेवर दबाव? चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात, तर महिला आयोगाचे अहवाल सादर करण्याचे आदेश

रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप करणाऱ्या तरुणीचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास काल प्राप्त झाला असून वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करून याचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे पोलिसांचा पीडितेवर दबाव? चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात, तर महिला आयोगाचे अहवाल सादर करण्याचे आदेश
शिवसेना नेते रघुनाथ कुचिकImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 7:43 PM

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याचा भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कुचिक बलात्कार प्रकरणात न्याय देणे बाजूलाच राहिले हे प्रकरण मिटवण्यासाठी वेळकाढूपणा केला जातोय. पीडित मुलीला न्यायासाठी साथ देणे संगनमत असेल तर होय मी संगनमत केले आहे. पिडीतेला वैद्यकीय उपचाराची गरज आहे ते न देता पीडितेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. (BJP leader Chitra Wagh attacks government in Raghunath Kuchik case)

शिवाजीनगर पोलिसांनी या पीडित तरुणीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही पीडित तरुणीला सर्वतोवरी मदत करत आहोत. आज पीडित तरुणी पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही तिचा जबाब घेऊन तिच्या जेवणाचीही व्यवस्था केली. पण पत्रकार आल्याचं कळताच पीडित तरुणी जेवता जेवता बाहेर निघून गेली, असे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले.

चित्रा वाघ यांच्याकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार

स्वपक्षीय बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्तेतील अधम महिला नेतृत्वाच्या राज्यात दुसरी पूजा चव्हाण होऊ द्यायची नाही या निर्धाराने मी पीडितेच्या मागे संपूर्ण ताकतीने उभी राहिलेली बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलीये. एका तरुण मुलीचं दुःख दुसरी महिला समजू शकत नाही का ? एव्हढा निगरगट्टपणा ? पोलिसांना लेखी देऊनही तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट न करण्यासाठी कोण पडद्यामागून पोलिसांचे हात बांधून ठेवतंय ? पीडितेला खोटं ठरवण्यासाठी बलात्काऱ्याच्या मुलीला पुढे करण्याची चाल कोणत्या मंथरेची आहे ? असे सवालही चित्रा वाघ यांनी ट्विटमधून केले आहेत.

महिला आयोगाचे अहवाल सादर करण्याचे आदेश

रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप करणाऱ्या तरुणीचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास काल प्राप्त झाला असून वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करून याचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, रघुनाथ कुचिक प्रकरणी महिला आयोगाने आम्हाला पत्र पाठवले आहे. त्या अनुषंगाने योग्य तो तपास करून अहवाल दिला जाईल, असे पोलिस आयुक्त श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले. रघुनाथ कुचिक यांच्या मुलीनेही चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. पीडित मुलगी आणि चित्रा वाघ यांची नार्को चाचणी करण्याची मागणीही कुचिक यांच्या मुलीने केली आहे.

कुचिक यांची नार्को टेस्ट करावी, मी टेस्टला तयार

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात 17 फेब्रुवारी 2022 रोजी 24 वर्षीय तरुणीने पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. कुचिकने आपल्याला लग्नाचे आमिष देऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. यासंदर्भात मी संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनी मदत केली नाही. इंजेक्शन देऊन मला बेशुद्धावस्थेत माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. महिला आयोग, पुणे पोलिसांकडून मला मदत मिळाली नाही. म्हणून मला चित्रा वाघ यांच्याकडे जावं लागलं. मला न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांना जबाब महत्वाचा आहे, माझे आरोग्य महत्वाचे नाही. ते चुकीचं वागत आहेत. ज्याप्रमाणे कुचिक यांच्या मुलीने अर्ज केला त्याप्रमाणे माझ्या मागणीकडे पण पहावं. माझी मागणी आहे की कुचिक यांची नार्को टेस्ट करावी, मी टेस्टला तयार आहे, अशे पीडित तरुणीने टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. (BJP leader Chitra Wagh attacks government in Raghunath Kuchik case)

इतर बातम्या

Amaravati Poisoning : अमरावतीत सकाळचं जेवण रात्री खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा, चौघांची प्रकृती गंभीर

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून बंदुक रोखली, सहा जणांवर गुन्हा दाखल

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.