खरातच्या फोनच्या लिक झालेल्या CDR प्रकरणी काय होणार? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सस्पेन्स संपवला!

कथित सीडीआरबाबत खरातवरील आरोपांची चौकशी करणाऱ्या एसआयटी पथकाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीडीआर लिकप्रकरणात नेमकं काय होणार? याबाबत एसआयटी पथकाने सांगितले आहे.

खरातच्या फोनच्या लिक झालेल्या CDR प्रकरणी काय होणार? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सस्पेन्स संपवला!
ashok kharat and tejaswi satpute
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2026 | 6:30 PM

Ashok Kharat CDR: भोंदू अशोक खरात प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचा कथित सीडीआर आपल्याकडे आहे, असे सांगत खळबळजनक दावे केले. खरात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एकूण 17 वेळा कॉल झाले, असा दावा त्यांनी केलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचेही खरातसोबत कॉल झाले होते, असा दावा त्यांनी केला होता. दरम्यान, आता याच कथित सीडीआरबाबत खरातवरील आरोपांची चौकशी करणाऱ्या एसआयटी पथकाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीडीआर लिकप्रकरणात नेमकं काय होणार? याबाबत एसआयटी पथकाने सांगितले आहे.

सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती

अशोक खरातविरोधातील आरोपांची चौकशी करणाऱ्या एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज (7 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात नेमका काय तपास केला? तपासात आतापर्यंत काय-काय समोर आलं? याबाबत त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणी समोर आलेले व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांना दमानिया यांनी समोर आणलेल्या कथित सीडीआरच्या माहितीबाबत विचारलं. यावर त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. परंतु सीडीआर लिक शासन स्तरावर चौकशी होत आहे. चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते समोर येईल, असे सातपुते म्हणाल्या.

लिक सीडीआरवर सातपुते नेमकं काय म्हणाल्या?

कथित सीडीआर लिक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. हा सीडीआर कशा पद्धतीने लिक झाला? यामागे नेमकं कोण आहे? याची चौकशी केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं होतं. तसेच खरात प्रकरणात समील असणाऱ्यांना सोडणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

सुषमा अंधारे यांनी केली होती दमानिया यांच्यावर टीका

दरम्यान, अंजली दमानिया यांनी कथित सीडीआर समोर आणल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील लॉबीच्याच लोकांचे कॉल डिटेल्स दमानिया यांनी समोर आणले आहेत, असं अंधारे म्हणाल्या होत्या. त्यानंतर दमानिया यांनी अंधारे यांच्यावरही टीका केली होती.

Follow Us