Maharashtra News Live Update : वीज कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : वीज कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द
Breaking
Image Credit source: tv9
Shubham Kulkarni | Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 11:14 PM

आज गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गोव्याचा शपथविधी विशेष असल्याने याकडे आज देशभराचं लक्ष असणार आहे. कारण, गोव्याच्या 40 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काँग्रेसला एकत्र घेऊन विरोधकांची मोट बांधण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केला. त्याविषयी शिवसेना नेते संजय राऊतांनी अनेकदा बोलूनही दाखवलं. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसून आलं. यामुळे गोव्याच्या शपथविधीकडे देशभराचं लक्ष असणार आहे.

Follow Us