माणसाला लाथडणाऱ्यांच्या जगात बससमोर कंडक्टर झाला नतमस्तक; सोशल मीडियावर फोटो होतोय प्रचंड व्हायरल…

| Updated on: Aug 08, 2022 | 11:28 PM

मुंबईः महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळ (State Transport Corporation) मागील काही दिवसांपासून दीर्घकाळ चाललेल्या संपामुळे प्रचंड चर्चेत आले, मुंबईत आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढल्यामुळे आंदोलनाला वेगळी दिशा लागली. त्यानंतर काही दिवसांनी टप्प्याटप्प्यांनी राज्यातील एसटी रस्यावर दिसू लागली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बस महाराष्ट्रातील प्रत्येक रस्त्यावर दिसू लागल्या. गाव तिथं बस असं ब्रिद […]

माणसाला लाथडणाऱ्यांच्या जगात बससमोर कंडक्टर झाला नतमस्तक; सोशल मीडियावर फोटो होतोय प्रचंड व्हायरल...
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळ (State Transport Corporation) मागील काही दिवसांपासून दीर्घकाळ चाललेल्या संपामुळे प्रचंड चर्चेत आले, मुंबईत आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढल्यामुळे आंदोलनाला वेगळी दिशा लागली. त्यानंतर काही दिवसांनी टप्प्याटप्प्यांनी राज्यातील एसटी रस्यावर दिसू लागली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बस महाराष्ट्रातील प्रत्येक रस्त्यावर दिसू लागल्या. गाव तिथं बस असं ब्रिद घेऊन जगणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातील कंडक्टर सी. बी. जाधव यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Vengurla Bus Depo Photo Viral) झाला आहे. सी. बी. जाधव (conductor C. B. Jadhav) सेवानिवृत्त झाले असून त्यांनी आपल्या सेवेतील शेवटचा दिवस असताना त्यांनी लालपरी म्हणजे राज्य परिवहन मंडळाच्या बससमोर बसून तिच्यासमोर हात जोडून कृतज्ञता व्यक्त करतानाचा सी. बी. जाधव यांचा तो फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर ज्या वाहक सी. बी. जाधव यांचा फोटो व्हायरल झाला आहे, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील बस स्थानकातील असल्याचे पोस्ट केले गेले आहे. तर ज्या बससमोर सी. बी. जाधव नतमस्तक झाले आहेत, ती बसही अरोंदा -वेंगुर्ला अशी पाटी लावलेली दिसत आहे.

कामावरची निष्ठा

वेंगुर्ला बस स्थानकात सेवा बजावणारे सी. बी. जाधव काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले, ज्या दिवशी ते निवृत्त झाले त्या दिवशी भावूक होत ज्या बसने कित्येक वर्ष आपल्याला सांभाळाले, जिच्या जीवावर आपला उदरनिर्वाह चालू होता, आपलं घर चाललं त्या निर्जिव बसविषयी कृतज्ञता व्यक्त करताना वाहक सी. बी. जाधव भावूक होऊन तिच्यासमोर नतमस्तक होत हात जोडून बसविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत. कंडक्टर सी. बी. जाधव यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला सोशल झाला आहे. हिंदी माध्यमांनी या फोटोची दखल घेतली गेली आहे.

 

लालपरीसमोर नतमस्तक

महाराष्ट्रातील लालपरी म्हणत असंख्य जणांना ज्या बसमधून दूरदूरपर्यंत प्रवास केला, त्या बसबद्दल आपल्या भावना व्यक्त करतानाच सी. बी. जाधव यांचा बससमोर नतमस्तक होतानाचा फोटो पाहून अनेक जणांनी त्याला भावनिक कॅप्शन देत तो शेअर केला आहे.

बस निर्जीव असली तरी…

कोणी कामाची निष्ठा, कोणी कृतज्ञता म्हणत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून आपल्या कामावरची निष्ठा किती प्रामाणिक आहे, आणि ज्या गोष्टीविषया आपल्या मनात नितांत आदर, आपुलकी असते मग ती वस्तू जिवंत असो वा निर्जिव त्यासमोर कंडक्टर सी. बी. जाधव यांच्यासारखं नतमस्तक होताना आपले हातही सहज जोडले जातात हेच या फोटोतून दिसत आहे.