Special Report | नितीश कुमार भाजपला सोडणार?

नितीश कुमार येत्या काही दिवसात भाजपला धक्का देण्याच्याच तयारीत असल्याचे बोलले जात आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत काडीमोल घेतला तर मात्र भाजप सत्तेबाहेर जाऊन महाराष्ट्रात ज्या प्रकारची स्थिती शिवसेनेची झाली त्याच प्रमाणे भाजपची होण्याची शक्यता आहे. 

महादेव कांबळे

|

Aug 08, 2022 | 10:23 PM

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकारला पायउतार व्हावं लागलं तशीच स्थिती बिहारमध्ये संयुक्त जनता दलाबरोबर असलेल्या भाजपची झाली आहे. आरसीपी सिंह यांचा वापर करून पार्टीत फूट पाडल्याचा आरोप नितीश कुमारांकडून केला जात आहे.त्यामुळे बिहारमधील भाजपसोबत नांदत असलेले नितीश कुमार काडीमोड घेण्याच्या तयारीत आहेत. सत्तेत राहून आपल्याच पक्षात फूट पाडण्याचे कारस्थान केले जात असल्याची टीकाही नितीश कुमार यांनी केली आहे. त्यामुळे नितीश कुमार येत्या काही दिवसात भाजपला धक्का देण्याच्याच तयारीत असल्याचे बोलले जात आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत काडीमोल घेतला तर मात्र भाजप सत्तेबाहेर जाऊन महाराष्ट्रात ज्या प्रकारची स्थिती शिवसेनेची झाली त्याच प्रमाणे भाजपची होण्याची शक्यता आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें