Pune Gram Panchayat Election Results 2021: इंदापूर कुणाचं?, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंचे दावे प्रतिदावे

| Updated on: Jan 18, 2021 | 5:46 PM

Maharashtra gram panchayat election results 2021: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात 37 ग्रामपंचायतीमध्ये भाजपनं तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 36 ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. (Harhswardhan Patil Dattatray Bharne)

Pune Gram Panchayat Election Results 2021: इंदापूर कुणाचं?, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंचे दावे प्रतिदावे
हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे
Follow us on

पुणे : जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचा तालुका म्हणून इंदापूर तालुक्याची ओळख आहे. इंदापूरमधील 60 ग्रामपंचायतींपैकी 37 ग्रामपंचायतीवर मतदारांनी कौल दिल्याचं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र यश मिळालं आहे. इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केल्याबद्दल अभिनंदन करतो, असंही पाटील म्हणाले. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात जनतेने कौल दिल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला. तर, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील 36 ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 Harshwaradhan Patil and Dattatray Bharne claimed they win major Gram Panchayat in Indapur)

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात कौल, हर्षवर्धन पाटलांचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणुकांना एक वर्ष झाल्यानंतर झालेल्या या पहिल्या मोठ्या निवडणुकांमध्ये आपल्याला कौल मिळाला, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे. जनतेच्या विश्वासावर आपल्याला पुढील टप्पा गाठायचा आहे, असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

60 पैकी 37 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात : हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुक्यात राषट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन यांच्या गटामध्ये चुरशीच्या लढती झाल्या. इंदापूर तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीपैकी 37 ग्रामपंचायती भाजपच्या आल्या असून 6 ग्रामपंचायती संमिश्र आहेत, असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला. 15 ते 18 ग्रामपंचायती विरोधात गेल्या असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

इंदापूर तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व : राज्यमंत्री भरणे

तालुक्यातील 36 ग्रामपंचायती वरती राष्ट्रवादीचे वर्चस्व असून पाच ते सहा ग्रामपंचायती संमिश्र झाल्या असल्याचा दावा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांन केला आहे. मात्र, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना निधी कमी पडून देणार नाही, असंही भरणे म्हणाले. सर्वात जास्त सरपंच ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच होणार, असाही दावा भरणे यांनी केला.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ग्रामपंचायतीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना झटका बसला आहे. तर, भिगवणमध्ये विद्यमान मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गटाच्या हातून ग्रामपंचायतची सत्ता निसटली आहे.

संबंधित बातम्या:

अपराजित योद्धा, वय 73, दहावी पंचवार्षिक, प्रतिस्पर्धी उमेदाराला हरिद्वार यांनी लोळवलं…!

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटीलवर गुलाल

Solapur Gram Panchayat Election Results 2021: ‘या’ गावात आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड; महाविकास आघाडी, भाजपही पराभूत

(Maharashtra gram panchayat election results 2021 Harshwaradhan Patil and Dattatray Bharne claimed they win major Gram Panchayat in Indapur)