अपराजित योद्धा, वय 73, दहावी पंचवार्षिक, प्रतिस्पर्धी उमेदाराला हरिद्वार यांनी लोळवलं…!

हरिद्वार चंद्रभान खडके यंदाच्या वर्षीही निवडणुकीच्या आखाड्यात विजयी झाले आहेत. दहाव्या पंचवार्षिक निवडणुकीतही लोकांनी त्यांना मतरुपी आशीर्वाद दिले आहेत.

अपराजित योद्धा, वय 73, दहावी पंचवार्षिक, प्रतिस्पर्धी उमेदाराला हरिद्वार यांनी लोळवलं...!
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 3:11 PM

यवतमाळ : राज्याच्या राजकारणात वयाच्या 73 व्या वर्षी न थांबता, न थकता काम करत सत्ता काबीज करणारे अनेक नेते आहेत. तशाच प्रकारे न थांबता, न थकता, आणि महत्त्वाचे म्हणजे एकदाही निवडणुकीत पराभूत न होता 73 व्या वर्षीही जिद्दीने काम करणारे यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड गावातले हरिद्वार चंद्रभान खडके यंदाच्या वर्षीही निवडणुकीच्या आखाड्यात विजयी झाले आहेत. दहाव्या पंचवार्षिक निवडणुकीतही लोकांनी त्यांना मतरुपी आशीर्वाद दिले आहेत. (Maharashtra Gram Panchayat election results 2021 live updates yavatmal Grampanchayat election not a single defeat yavatmal Harivdar Khadke story)

यवतमाळच्या सावरगड गावात 73 वर्षाचा योद्धा गावच्या सक्रिय राजकारणात आहेत. गेली 45 वर्ष सावरगड गावात ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, उपसरपंच अशी विविध पदे भूषवत हरिद्वार चंद्रभान खडके हे तरुणांना लाजवेल असे काम करत आहेत. वयाच्या 73 वर्षीदेखील हरिद्वार खडके निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यंदाही 10 व्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवलाय.

1972 पासून सतत 9 वेळा ग्रामपंचायत निवडणुकीत ते उभे राहिले आणि विजयी झाले… अपराजित म्हणून त्याची पंचक्रोशीत ख्याती आहे. यंदा दहाव्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात होते. यंदाही मतदारराजाने त्यांना भरभरुन मतरुपी आशीर्वाद दिले आहेत.

हरिद्वार यांची राजकीय कारकीर्द

1972 ला हरिद्वार खडके यांनी पहिली निवडणूक लढवली. त्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला आणि थेट उपसरपंच झाले. त्यानंतर त्यानी मागे वळून पहिलेच नाही आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत ते निवडून आले 1972 ते 2020 या कालावधीत  20 वर्ष सरपंच, 15 वर्ष उपसरपंच, 2 वेळा पंचायत समिती सदस्य… असे तब्बल 45 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. आजही ते सरपंच आहेत.

याच दरम्यान त्यांच्या पत्नी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2000 साली निवडून आल्या. 1978 साली हरिद्वार खडके यांनी 27 गावातील लोकांना एकत्र करत आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी स्थापन केली त्याचे ते 25 वर्ष अध्यक्ष होते. गावातील लोकांचा विश्वास जिंकल्याने मला आजवर जनतेने साथ दिली आणि मी निवडून येत गेलो. आजही जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला आणखी प्रेरित केले आहे, असे त्यांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितले.

वय जरी जास्त असले तरी युवकांना लाजवेल, असं काम हरिद्वार खडके करतात. सकाळी 5 वाजता आपली दिनचर्चा ते सुरु करतात. संपूर्ण गावात रोज भेट देतात. गावातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत राहतात.

(Maharashtra Gram Panchayat election results 2021 live updates yavatmal Grampanchayat election not a single defeat yavatmal Harivdar Khadke story)

हे ही वाचा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटीलवर गुलाल

Nagar Gram Panchayat Election Results 2021: गड आला पण सिंह गेला; राहता तालुक्यात विखेंचाच बोलबाला

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.