Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Big breaking
Image Credit source: tv9
मुंबई : आज दिनांक 14 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महापालिकेने ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज ऋतुजा लटके या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात.
Follow Us