Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Big breaking
Image Credit source: tv9
आज दिनांक 16 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सामनामधून पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचा वापर शिवसेनेविरोधात ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’प्रमाणे होत आहे. ‘शिंदे’ नामाचा महाराष्ट्रातील इतिहास शौर्याचा व इमानाचा आहे, पण सध्याचे शिंदे हे महाराष्ट्राचे खलपुरुष ठरत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही’. असा घणाघात सामनाच्या रोखठोक या सदरामधून करण्यात आला आहे. यावर आता शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पिकांचं नुकसान झालं आहे. जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.
Follow Us