Maharashtra News Live : शिवसेनेच्या वॉर रूम मधील संभाषण बाहेर आलं तर बरच काही बाहेर येईल

Maharashtra News Live : नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी पैसेवारीवरून आमदार चंद्रकांत रघुवंशी आक्रमक. अधिकाऱ्यांना पापी म्हणत प्रशासनाला दिली तंबी. पैसेवारी आणि आणेवारी निश्चित करताना कोणत्याही विभागाने अडथळा आणू नये. पैसेवारीत पैसे खाणारे पाप करणारे लोक आहेत असं ते म्हणाले.

Maharashtra News Live : शिवसेनेच्या वॉर रूम मधील संभाषण बाहेर आलं तर बरच काही बाहेर येईल
Breaking news
| Updated on: Oct 24, 2026 | 11:32 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Oct 2026 11:28 AM (IST)

    शिंदेंना बदनाम मी केलं की रामदास कदमांनी – जरांगे पाटील

    रामदास कदम यांच्याकडे ओरिजनल क्लिर आहे, त्यामध्ये तारीख सगळं आहे. शिंदेंना बजनाम मी केलं, की रामदास कदम यांनी केलं. रामदास कदम यांचा नक्की हेतू काय याबाबत आता संशय आहे… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 24 Oct 2026 11:25 AM (IST)

    मी एकटा सर्वांना पुरुन उरेन – जरांगे पाटील

    मी एकटा सर्वांना पुरुन उरेन… रामदास कदम यांच्याकडे ओरिजनल क्लिप आहे, त्यामध्ये तारीख सगळं आहे. सगळे मिळून माझ्या मागे लागणार, मी एकटा सर्वांना पुरुन उरणार… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.


  • 24 Oct 2026 11:22 AM (IST)

    ऑडिओ क्लिप ओरिजनल आहे, AI जनरेटेड नाही – जरांगे पाटील

    ऑडिओ क्लिप ओरिजनल आहे, AI जनरेटेड नाही. षडयंत्र उघडं पाडलं म्हणून दोन्ही पक्ष माझ्या मागे लागतील. शिंदे, फडणवीस मिळून माझ्या मागे लागतील.. सगळं पडद्यामागचं सत्य बाहेर काढलं आहे… असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं आहे.

  • 24 Oct 2026 11:20 AM (IST)

    भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम शिवसेनेत एकटे पडल्याची चर्चा

    जरांगे पाटलांच्या क्लिपवरील टीकेनंतर रामदास कदम भाजपच्या निशाण्यावर? भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून रामदास कदमांवर टीका होत आहे,  मात्र मंत्री उदय सामंत यांच्याशिवाय शिवसेनेतील अन्य नेत्यांकडून भाजपला प्रत्युत्तर नाही. रामदास कदमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मित्रपक्षाकडून होत असलेल्या कथित कटाबाबत नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत क्लिपच्या चौकशीची  मागणी  केली मात्र, कदमांवरील भाजप आमदारांच्या टीकेला शिवसेनेतील नेत्यांची चुप्पी आहे.  भाजपला थेट आव्हान देणारे रामदास कदम पक्षातच एकाकी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.  शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

  • 24 Oct 2026 11:10 AM (IST)

    कुत्रे भुंकल्याने चिमुकली पळाली, चुलीवरील गरम दूध अंगावर पडून तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू, नांदूर हवेली गावातील घटना.

    बीडच्या नांदूर हवेली गावात चुलीवरील गरम दूध अंगावर पडून 3 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुर्गा असं त्या मुलीचं नाव आहे. दुर्गा आपल्या घराच्या समोर खेळत असताना एक कुत्रा भुंकून तिच्या दिशेने येत होता यामुळे ती घाबरली आणि घरात पळाली. अंगणात चुलीवर तापत ठेवलेले दुधाच्या पातेल्याला ती जाऊन धडकून पडल्याने गरम दुधाने भरलेले पातेले तिच्या अंगावर पडल्याने ती गंभीररित्या भाजली. उपचारासाठी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे उपचार होऊ शकले नाहीत अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नांदूर हवेली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


  • 24 Oct 2026 10:51 AM (IST)

    टायगर श्रॉफ प्रकरण दोन पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त

    टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण. गुन्हे शाखेने दोन पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली. गुजरातच्या सुरतमधून केली जप्त

  • 24 Oct 2026 10:27 AM (IST)

    पुण्यातील उच्चभ्रू शाळेत नववीच्या विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला

    पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी परिसरातील नामांकित शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

  • 24 Oct 2026 10:10 AM (IST)

    नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे दोन गटात हाणामारी

    नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे परवा रात्री दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांसमोर झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राजकीय वादातून परवा रात्री दुर्गा देवी विसर्जनावेळी दोन गटात हाणामारी झाली होती. नंतर दोन्ही गटात समन्वयाने वाद मिटविण्यात आला होता. त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. काल रात्री पुन्हा हे दोन गट आप आपसात भिडले. दोन गटात काल रात्री झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत. एका गटातील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गटातील लहू मेटकर नामक तरुण जखमी आहे. या दोघांवर उपचार सुरू आहेत.

  • 24 Oct 2026 10:07 AM (IST)

    शिवसेनेच्या वॉर रूम मधील संभाषण बाहेर आलं तर बरच काही बाहेर येईल – मनसे

    शिवसेनेच्या वॉर रूम मधील संभाषण बाहेर आलं तर बरच काही बाहेर येईल. लोकशाहीला सुरुंग लावण्याचं ही षडयंत्र. दोन पक्षाच्या भांडणामध्ये इंटरेस्ट नाही. वृत्त समूहाला लालूच देऊन षडयंत्र रचलं जात का. महायुतीमध्ये बेबनाव आहे की नाही यात आम्हाला इंटरेस्ट नाही मात्र विरोधी पक्ष नेता संपवण्यासाठी हे करत आहेत का षडयंत्र संदीप देशपांडेंचा सवाल

पुणे पदवीधरसाठी 62.78 टक्के, शिक्षकसाठी 85.87 टक्के मतदान झालं. गत निवडणुकीपेक्षा टक्केवारीत वाढीमुळे निकालाची उत्कंठा. सन 2020 च्या निवडणुकीच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघात 12.83 टक्के, तर पदवीधर मतदारसंघात 4.82 टक्क्यांनी मतदान वाढले. विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारंसघात शुक्रवारी 62.78 टक्के मतदान आणि शिक्षक मतदारसंघात उच्चांकी 85.87 टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघात तीन लाख 88 हजार 19 मतदारांपैकी दोन लाख 43 हजार 611 जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 62.78 झाली. सन 2020 मध्ये चार लाख 26 हजार 257 मतदारांपैकी दोन लाख 47 हजार 917 जणांनी मतदान केले होते. त्या वेळी 57.96 टक्के मतदान झाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us