Hooch Tragedy Pune : पुणे विषारी दारु प्रकरणात मोठी कारवाई, तीन पोलिस अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

पुण्यातील फुगेवाडी आणि हडपसर येथे विषारी दारु प्यायल्याने १२ हून अधिक जणांचा काल मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पोलिसांनाही या प्रकरणाचा फटका बसला आहे.

Hooch Tragedy Pune : पुणे विषारी दारु प्रकरणात मोठी कारवाई, तीन पोलिस अधिकाऱ्यांचे थेट निलंबन
pune toxic liquor case
| Updated on: May 29, 2026 | 11:03 PM

राज्याला हादरवून सोडणाऱ्या पुणे पिंपरी-चिंचवड आणि हडपसर येथील विषारी दारु प्रकरणातील मृत्यूची संख्या १२ हून अधिक झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता कारवाई वेगवान केली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा आणि कर्तव्यातील हलगर्जीपणा दाखवल्याने पुणे शहर पोलिस दलातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश दिले आहेत.

पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथील फुगेवाडीत काल विषारी दाऊ पिऊन आठ जणांचा सुरुवातीला मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर हडपसर येथेही पाच जणांचा विषारी दारुने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस दलातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या अधिकाऱ्यात हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचा समावेश आहे.

प्रभावी कारवाई करण्यात अपयशाचा ठपका

पिंपरी – चिंचवड येथील फुगेवाडी तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारू प्यायल्याने १२ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात विषारी दारु मृत्यू प्रकरणात अनेक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अवैध दारू विक्रीबाबत माहिती असूनही प्रभावी कारवाई करण्यासंबंधित अधिकाऱ्यांवर अपयशाचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेलाही तडा गेल्या म्हटले जात आहे.

 

Follow Us