मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एका साक्षीदाराने साक्ष बदलली; आतापर्यंत 18 जण पलटले

| Updated on: Feb 28, 2022 | 1:09 PM

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींपैकी आजही एकाने जबाब बदल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत अठरा जणांनी जबाब बदललेत. त्यामुळे नेमकी यंत्रणा कुठे कमी पडतेय, असा सवाल निर्माण होत आहे. दरम्यान, यापू्र्वी झालेल्या सुनावणीत साक्षीदाराने न्यायालयाला एटीएस अधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याचा दावा केला होता.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एका साक्षीदाराने साक्ष बदलली; आतापर्यंत 18 जण पलटले
प्रेमविवाह केला म्हणून मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क संपत नाही
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

मुंबईः देशभरातल्या राजकारणाला वेगळे वळण लावणाऱ्या आणि हिंदू (Hindu) दहशतवाद शब्द जन्माला घालणाऱ्या मालेगाव (Malegaon ) स्फोटातील खटल्यात आणखी एका साक्षीदाराने साक्ष बदलल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 18 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. शिवाय आजच्या सुनावणीत एक साक्षीदार फुटल्याचेही समजते. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या ‘एनआयए’च्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही ‘एनआयए’ने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती. त्याने दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) तत्कालीन अधिकारी परमबीर सिंह आणि श्रीराव यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.

कधी लागणार निकाल?

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे. मात्र, या प्रकरणाचा निकाल कधी येणार, हे नक्की सांगणे अवघडय.

का बदलतायत जबाब?
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींपैकी आजही एकाने जबाब बदल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत अठरा जणांनी जबाब बदललेत. त्यामुळे नेमकी यंत्रणा कुठे कमी पडतेय, असा सवाल निर्माण होत आहे. दरम्यान, यापू्र्वी झालेल्या सुनावणीत साक्षीदाराने न्यायालयाला एटीएस अधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याचा दावा केला होता. साक्षीदाराने त्यांच्या म्हणण्यानुसार जवाब दिला नाही तर त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचवण्यात येईल. आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करावा ह्यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर आव्हान उभे राहिले आहे. वारंवार बदलले जाणारे जबाबही त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करू शकतात.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान