चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

भाजपने तर नाशिकच्या महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आकाश-पाताळ एक केले आहे. त्यात नाशिकमध्ये कालिदास कलामंदिर हे एकमेव नाट्यगृह. याच नाट्यगृहामध्ये एका नगरसेविकाने ऐनवेळेस डॉ. भागवत कराड यांचा कार्यक्रम घ्यायचा निश्चित केला. त्यामुळे कुर्रर्रर या राजकीय नाट्याची सुरुवात झाली.

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये 'कुर्रर्रर' राजकीय नाट्य...!
डॉ. भागवत कराड, मंत्री.
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 5:01 PM

नाशिकः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad). त्यांच्या सेवा तत्परतेचा अनुभव अनेकांनी घेतला. विमान प्रवास करताना प्रवाशाला कधी काही झाले, तर मंत्र्यांमधला डॉक्टर कसा जागा होतो, हे अनेकांनी पाहिले. राजधानी नवी दिल्लीत तर त्यांनी अशा केलेल्या अनेक सदकार्याची चांगलीच चर्चा असते. नाशिकमध्ये (Nashik) मात्र त्यांच्या दौऱ्यात एक अफलातून असे कुर्रर्रर नाट्य रंगलेले पाहायला मिळाले. त्याला कारणीभूत ठरली भाजपच्या (BJP) स्थानिक राजकीय नेत्यांची नसती उठाठेव. याचा नाहक मनस्ताप मग थेट आयुक्तांपासून ते कलावंत मंडळींना भोगावा लागला. शेवटी आयुक्तांनी अशी काही चावी फिरवली की, सारेच शांत झाले. या राजकीय नाट्याची महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये खुसखुशीत चर्चा रंगलीय.

त्याचे झाले असे की…

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आहेत. कुठले उद्घाटन, तर कुठल्या भेटी-गाठी. त्यात महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली. भाजपने तर नाशिकच्या महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आकाश-पाताळ एक केले आहे. त्यात नाशिकमध्ये कालिदास कलामंदिर हे एकमेव नाट्यगृह. याच नाट्यगृहामध्ये एका नगरसेविकाने ऐनवेळेस डॉ. भागवत कराड यांचा कार्यक्रम घ्यायचा निश्चित केला. त्यामुळे कुर्रर्रर या राजकीय नाट्याची सुरुवात झाली.

अन् नाटक रंगत गेले…

नाशिकमध्ये सध्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपच्या नगरसेविकेचा कार्यक्रम. उपस्थितीही थेट केंद्रीय मंत्र्यांची. मात्र, दुसरीकडे या नाट्यगृहात कुर्रर्रर नावाच्या नाटकाचे नियोजन महिनाभरापासून आधीच झालेले. कलावंतांचा संच नाशिकमध्ये डेरेदाखल झालेला. शेकडो रसिकांनी या नाटकाची तिकीटे आधीच बुक केलेली. कोरोनाकाळानंतर आत्ता कुठे सारे सुरळीत होत आहे. मात्र, या नाटकाचा प्रयोग मंत्री कराड यांच्या अचानक ठरलेल्या कार्यक्रमासाठी रद्द करा, असा हट्ट या नगरसेविकेने धरला. आधीच दोन वर्षांपासून नाटक बंद असल्या कलावंतांची चांगलीच कोंडी झालीय. त्यात हे नसतेच विघ्न उद्भवले.

मग आयुक्तांनी पडदा उघडला…

भाजप नगरसेविकाच्या हट्टापुढे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. नाटकाची आयोजक कंपनी, व्यवस्थापक साऱ्यांनाच काही समजेना. शेकडो रसिकांनी तिकीटे अगोदरच बुक केलेली. त्यात नाटकाचा प्रयोग ऐनवेळी रद्द झाला, तर त्यांच्या संतापाला कसे सामोरे होणार? शिवाय आर्थिक भुर्दंड तर वेगळाच. त्यामुळे नाट्यगृहाचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांनी शेवटी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. आयुक्तांनी मंत्री डॉ. कराडांच्या ऐनवेळी होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यामुळे कुर्रर्र या राजकीय नाटकाचा पडदा एकीकडे पडला आणि खऱ्या नाटकाचा पडदा अखेर आयुक्तांनी उघडला. आता कराड यांचा नगरसेविकेने आयोजित केलेला ऐनवेळचा कार्यक्रम शहरातील रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. मात्र, या राजकीय नाट्याची खुसखुशीत चर्चा रंगली आहे.

इतर बातम्याः

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!

युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.