Malegaon | 30 वर्षांपासून बंद असलेली खोली उघडली अन् मानवी कवटी, हाडे सापडली; मालेगावमध्ये खळबळ!

आताही पुन्हा एकदा मालेगाव चर्चेत आले आहे. त्याला कारण आहे चक्क 30 वर्षांपासून बंद असलेलेल्या वाडिया हॉस्पिटलच्या खोलीमध्ये सापडलेली मानवी कवटी आणि हाडे.

Malegaon | 30 वर्षांपासून बंद असलेली खोली उघडली अन् मानवी कवटी, हाडे सापडली; मालेगावमध्ये खळबळ!
संग्रहित फोटो (सौजन्यःगुगल)
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 4:44 PM

नाशिकः मालेगाव नेहमी चर्चेत असते. कधी अचानक वाढलेले कोरोना रुग्ण असतील. कधी अचानक कमी झालेले कोरोना रुग्ण असतील. कधी दंगल असू द्या की, थेट ड्रग्ज प्रकरणात पडलेले छापे. आताही पुन्हा एकदा मालेगाव चर्चेत आले आहे. त्याला कारण आहे चक्क 30 वर्षांपासून बंद असलेलेल्या वाडिया हॉस्पिटलच्या खोलीमध्ये सापडलेली मानवी कवटी आणि हाडे. या प्रकाराने शहरवासीय घाबरले असून, चौकशीसाठी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या गूढ प्रकाराची ही बित्तमबातमी.

नेमके प्रकरण काय?

मालेगावमध्ये महापालिकेचे प्रसिद्ध असे वाडिया हॉस्पिटल आहे. सध्या वाडियासह अली अकबर रुग्णालयाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही हॉस्पिटलच्या इमारतींचे काम सुरू आहे. अनेक खोल्या तोडल्या जात आहेत. नवे साहित्य विकत आणले जात आहे. खोल्या मोठ्या केल्या जात आहेत. या रुग्णालयाच्या आवारात गेल्या तीस वर्षांपासून बंद असलेली एक खोली आहे. हे सारे काम सुरू असल्याने ही खोलीही उघडण्यात आली. तेव्हा कर्मचाऱ्यांना धक्का बसला. त्यांना खोलीमध्ये चक्क मानवी कवटी आणि हाडे सापडली. ही माहिती त्यांनी वाडियाचे वैद्यकीय अधिकारी हेमंत गढरींना दिली. त्यांनी या प्रकरणाचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना पाठवला आहे. दरम्यान, या कवटीचा जबडा तुटलेला आहे. हाडाचे दोन्ही भाग तुटलेत. त्यामुळे ते शरीराच्या कोणत्या भागाचे आहे, हे ओळखणे अवघड झाले आहे.

वाडियात होते शवविच्छेदन गृह

वाडिया हॉस्पिटमध्ये पूर्वी एक शवविच्छेदन गृह होते. मात्र, मालेगावमध्ये सामान्य रुग्णालय सुरू झाले आणि येथील शवचिकित्सा बंद झाली. या शवविच्छेदन गृहाशेजारच्या खोलीमध्येच ही कवटी आणि हाडे सापडल्याचे समजते. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची माहिती महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांना दिली आहे. त्यांनी तातडीने चौकशी करून, पोलिसांमध्ये तक्रार करावी, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मानवी कवटी आणि हाडे कशाची असावीत, याबद्दल नाना तर्कवितर्क लढविले जात आहेत.

इतर बातम्याः

Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?

Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन

Nagar Panchayat Election result 2022 : द्राक्षपंढरी निफाडमध्ये भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीचे आमदार बनकरांनाही धक्का

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.