AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagar Panchayat Election result 2022 : द्राक्षपंढरी निफाडमध्ये भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीचे आमदार बनकरांनाही धक्का

नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निफाडमध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. येथील नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र, त्यांना साधा भोपळाही फोडता आला नाही.

Nagar Panchayat Election result 2022 : द्राक्षपंढरी निफाडमध्ये भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीचे आमदार बनकरांनाही धक्का
निफाडमध्ये विजयी उमेदवारांनी जोरदार जल्लोष केला.
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 1:43 PM
Share

नाशिकः उभ्या महाराष्ट्रात द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये नगरपंचायत (Nagar Panchayat) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. विशेष म्हणजे मतदारांनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप बनकरांनाही धक्का देत आपला कौल वेगळाच असल्याचे स्पष्ट केले आहे. येथे लागलेल्या या निकालाची जिल्ह्यात मोठ्या चवीने चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरी आणि कळवणध्ये आज जसे अपयश पाहावे लागले. त्याची पुनरावृत्ती येथे विद्यमान आमदारांबाबत घडली आहे.

अशी झाली निवडणूक

नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निफाडमध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. येथील नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र, त्यांना साधा भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे सुपडा साफ झाला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना देखील मोठा धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादी फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

शिवसेनेला यश

विशेष म्हणजे निफाडमध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम हे आपली प्रतिष्ठा टिकवण्यात यशस्वी ठरले आहेत. येथे शिवसेने सर्वाधिक सात जागांवर विजय मिळवला आहे. शहर विकास आघाडी चार, बसपकडे एक आणि काँग्रेसने एक जागा पटकावली आहे. त्यामुळे नगरपंचायतीवर शिवसेना, शहर विकास आघाडी, बसपा आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. मतदारांनी अत्यंत विचारपूर्वक दिलेल्या कौलाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

विजयी उमेदवार आणि मते…

– प्रभाग 01 – बसपा – अरुंधती पवार – 454

– प्रभाग 02 – अपक्ष – शिवाजी ढेपले – 533

– प्रभाग 03 – शिवसेना – अनिल कुंदे – 661

– प्रभाग 04 – शहर विकास आघाडी – शारदा कापसे – 578

– प्रभाग 05 – काँग्रेस – पल्लवी जंगम – 658

– प्रभाग 06 – शहर विकास आघाडी – साहेबराव बर्डे – 424

– प्रभाग 07 – शिवसेना – विमल जाधव – 305

– प्रभाग 08 – शिवसेना – सुलोचना होळकर – 321

– प्रभाग 09 – राष्ट्रवादी – सागर कुंदे – 335

– प्रभाग 10 – शिवसेना – डॉ कविता धारराव – 407

– प्रभाग – 11 शिवसेना – संदीप जेउघाले – 362

– प्रभाग – 12 शिवसेना – रत्नमाला कापसे – 587

– प्रभाग – 13 शिवसेना – रुपाली रंधवे – 502

– प्रभाग 14 – राष्टवादी – जावेद शेख – 372

– प्रभाग 15 – राष्टवादी – किरण कापसे – 306

– प्रभाग 16 – शहर विकास आघाडी – कांताबाई कर्डिले –

– प्रभाग 17 – शहर विकास आघाडी – अलका निकम – 258

अशा मिळाल्या जागा..

– एकूण जागा – 17

– शिवसेना – 07

– शहर विकास आघाडी – 04

– राष्ट्रवादी – 03

– काँग्रेस – 01

– बसपा – 01

– इतर – (अपक्ष) – 01

– भाजप – 00

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?

Agri | वायदे बाजार बंदी हटवा, जीएम तंत्रज्ञानाला परवानगी द्या; स्वतंत्र भारत पक्षाचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.