Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?

Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?
फोटोः गुगल.

कार्यक्रमांचे आयोजन करताना कोविड-19 बाबतच्या शासनाच्या नियमांचे पालन करून सर्वांनी नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 19, 2022 | 7:06 AM

नाशिकः आपली लोकशाही अढळ आणि तिच्यावरील निष्ठा अबाधित ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, बांधकाम क्षेत्रातील सर्व संस्था आणि सर्व ग्रामपंचायतींमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ (National Polling Day) साजरा होणार आहे. त्यानिमित्त हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

का साजर केला जातो दिन?

राज्यातील नवतरुणांचा मतदारांच्या यादीत समावेश करण्यासाठी व मतदान प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ सर्वत्र साजरा केला जातो. याअनुषंगाने जिल्ह्यातील मतदारांना विशेषत नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करून घेण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींनाही सूचना

राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व समाजात रुजावे यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करावा. तसेच कार्यक्रमांचे आयोजन करताना कोविड-19 बाबतच्या शासनाच्या नियमांचे पालन करून सर्वांनी नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. तसेच हे कार्यक्रम कसे घ्यावेत, याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

असे करावे आयोजन….

– जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त सर्व निवडणूक साक्षरता मंडळास राष्ट्रीय मतदार दिन रोजी शपथ घेवून साजरा करणेबाबत सूचना द्यावी. तसेच राजकीय पक्षांसोबत बैठका घेवून त्यांना राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणेबाबत विनंती करावी.

– राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम प्रांत, तहसीलस्तरावर तसेच महनगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांनी साजरा करावा. जिल्ह्यातील थिंक टँक सदस्य मधील मान्यवरांना तसेच जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात यावे.

– ग्राम विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये, विद्यापीठ अथवा महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी नियोजन करावे. या प्रसंगी शपथ घेण्याच्या कार्यक्रमासोबत निवडणूक व लोकशाही विषयावर रांगोळी, खेळ, वकृत्व तसेच व्याख्यान अशा विविध स्पर्धांचे आयोजन करावे.

– जिल्ह्यातील उद्योग समूह आणि सरकारी व निमसरकारी कार्यालये, स्वयंसेवी संस्था यांनी मतदार जागृती मंचामार्फत शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करावा.

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें