मालेगाव चिमुरडी अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, अखेर नराधमाला फाशीची शिक्षा

मालेगावातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. मालेगावातील या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मालेगाव चिमुरडी अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, अखेर नराधमाला फाशीची शिक्षा
Malegaon news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 12:14 PM

नाशिकच्या मालेगावातील डोंगराळे बालिका अत्याचार-हत्या प्रकरणाचा आज शुक्रवारी फैसला झाला. चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल जाहीर करण्यात आला.  मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयात आज शुक्रवारी निकाल जाहीर करत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्टाने दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणत नराधमाला फाशीची दिली. या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं.

मालेगावच्या डोंगराळे भागात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. आरोपी विजय खैरनार यावर दोषी असल्याचे आरोपी निश्चिती झाली होती.  या प्रकरणात शासन नियुक्त विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत होती.  त्यानंतर आज कोर्टाने न्याय दिल्याने मालेगावकरांनी समाधान व्यक्त केलं. या प्रकरणात पीडित कुटुंबीयांना दहा लाखांची मदत देण्यात आली. कोर्टात प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष महत्वाची ठरली. नराधमाने चॉकलेटचे आमिष देऊन पीडित मुलीवर अत्याचार केला.

Loading...

पीडितेचे वकील काय म्हणाले होते?

मालेगाव डोंगराळे प्रकरणावर पीडितेच्या वकील स्नेहा ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. स्नेहा ठाकरे म्हणाल्या होत्या, ‘या प्रकारात बाल साक्षीदाराची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. 16 नोव्हेंबर 2025 रोजी मानवी कृत्य आणि अत्याचार त्या मुलीवर झाले. तिला या आरोपीला शिक्षण मिळून हीच तिला श्रद्धांजली असेल. त्याची वासना आणि हेतू पुरस्कार त्यांनी हे केलेले आहेत. आरोपीने अमानूष कृत्य केलं. मुरळीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट केले. बीएनएस मध्ये त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे. परिस्थितीजन्य पुरावे आणि केस आहे.. तिची हत्या केली. त्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. या प्रकरणात बाल साक्षीदार खूप महत्वाचे ठरले आहे. बाल साक्षीदाराकडून हे सर्व काढून घेणे हे पुरावे म्हणून सादर करणे हा सर्वात मोठा युक्तिवाद आणि सर्वात मोठा पैलू होता’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us