मनोज जरांगेंकडून 500 कोटींचा आरोप, एकनाथ शिंदेंचं पहिल्यांदाच उत्तर, नेमकं काय म्हणाले?

मंगळवारी नारायण गड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट 500 कोटी रुपयांचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मनोज जरांगेंकडून 500 कोटींचा आरोप, एकनाथ शिंदेंचं पहिल्यांदाच उत्तर, नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया
Image Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Oct 21, 2026 | 5:22 PM

मंगळवारी नारायण गड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट 500 कोटी रुपयांचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात यावर उत्तर द्यावं असं आव्हानाच त्यांनी दिलं. एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या हातून मला पाचशे कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे, असं ते म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये भाजपला असं काही सांगितलं आहे का? असा सवालही जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून केला होता. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर आता पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे?

Loading...

मी कोणाला पाचशे कोटी रुपये दिलेही नाही आणि कोणाकडून घेतलेही नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील ज्या आधारावर बोलत आहेत, त्याची शहानिशा त्यांनी आधी करायला हवी होती, आणि त्यानंतर त्यांनी बोलायला हवं होतं. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी द्यायला पाहिजे होते. त्यांनी त्यांच्याकडे जे पुरावे आहेत, ते संबंधित यंत्रणांकडे द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. एवढंच मी आता सांगतो. एकनाथ शिंदेंना सगळा महाराष्ट्र ओळखतो, लोकांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. त्यामुळे बरेच लोक हेडलाईनसाठी एकनाथ शिंदे यांचं नाव घेत असतात. मनोज जरांगे पाटील हे समाजाचं काम करत आहेत, त्यांनी मराठा समाजाचं काम केलं पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटलांची उद्या पत्रकार परिषद 

दरम्यान उद्या मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्या पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे आता पत्रकार परिषदेत जरांगे पाटील नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us