मनोज जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने महायुतीत धमाका; 500 कोटींच्या आरोपानंतरही श्रीकांत शिंदे शांत? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मनोज जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने महायुतीत मोठा राडा झाला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करत आहे. यादरम्यान श्रीकांत शिंदे शांत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मनोज जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने महायुतीत धमाका; 500 कोटींच्या आरोपानंतरही श्रीकांत शिंदे शांत? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
shrikant shinde news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 10:03 AM

मनोज जरांगे यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या ऑडिओ क्लिपमधून भाजपशी संबंधित लोकांची नावे देखील समोर आली आहेत. तर या प्रकरणात भाजपकडून श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जरांगेंना 500 कोटी दिल्याचा आरोप आहे. यावरून मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना जाब विचारला होता. मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर आता शिंदे गटाचे नेत्यांकडून थेट भाजप नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे. शिंदे गटाचे रामदास कदम यांच्या आरोपांना भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. ऑडिओ क्लिपवर राजकीय वातावरण तापलं असतानाही श्रीकांत शिंदे अद्याप मौन बाळगून असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ऑडिओ क्लिपवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. या वादानंतरही श्रीकांत शिंदे यांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. जरांगे यांच्या 500 कोटींच्या आरोपांवर खासदार श्रीकांत शिंदे काय प्रतिक्रिया देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मागील दोन दिवसांत महायुतीत तणाव वाढल्याचे दिसत आहे. रामदास कदम यांनी भाजपचे नेते केसाने गळा कापण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला.

Loading...

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपांना आमदार प्रवीण दरेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरेकरांनी म्हटलं की, रामदास कदम यांनी बेजबाबदार वागणं चुकीचं आहे. पडद्याआडून जरांगेंना ताकद देणारे कोण होते?  देवेंद्र फडणवीसांना बदनाम करायलं कोण होतं? भाजपला दोष देणार असाल, तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. तुम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाबद्दल काय बोलतात, हे बाहेर काढल्यास तुम्हाला अवघड जाईल, असं प्रत्युत्तर लाड यांनी म्हटलं. ऑडिओ क्लिपवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये कलह सुरू झालाय. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप आणि कुरघोडीचे प्रयत्न होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑडिओ क्लिपवरून सुरू झालेल्या या वादावर खासदार श्रीकांत शिंदे काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us