मंत्रालयात चोरीची मोठी घटना! संजय राठोड यांच्या कार्यालयातून तब्बल…अर्ध्या रात्री कर्मचाऱ्यांची झडती?

मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयात 80 हजार रुपयांची रोख रक्कम कुठून आली, असे विचारले जात आहे. हीच रोख रक्कम चोरीला गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मंत्रालयात चोरीची मोठी घटना! संजय राठोड यांच्या कार्यालयातून तब्बल...अर्ध्या रात्री कर्मचाऱ्यांची झडती?
sanjay rathod and mantralaya
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2026 | 4:10 PM

Sanjay Rathod : सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम मंत्रालय कार्यालयातून केले जाते. राज्याचे वेगवेगळे मंत्री याच इमारतीत बसून आपापल्या खात्यासंदर्भात निर्णय घेतात. मंत्रालयातील कर्मचारी धोरणांची अंमलबजावणी कशी केली जाईल, हे प्राधान्याने पाहतात. म्हणूनच मुंबईत असलेले मंत्रालय हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. मंत्रालयात रोज शेकडो लोक आपापले काम घेऊन मंत्र्याच्या भेटीला येतात. परंतु मंत्रालयातील काही मंत्र्यांचे दालन, कार्यालय वेगवगेळ्या कारणांमुळे चर्चेत येते. सध्या मंत्री संजय राठोड यांचे कार्यलय आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. संजय राठोड यांच्या कार्यालयातून चक्क 80 हजार रुपये चोरीला गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नेमकी काय माहिती मसोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला गेले आहेत. तसं पाहायचं झालं तर मंत्रालयात 10 हजारापेक्षा जास्त पैसे घेऊन जाता येत नाहीत. परंतु तरीदेखील मंत्रालयात संजय राठोड यांच्या कार्यालयात तब्बल 80 हजार रुपयांची रोख चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. संजय राठोड यांच्या कार्यालयात 80 हजार रुपये आलेच कसे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Loading...

कर्मचाऱ्यांची घेण्यात आली झडती

संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपयांची चोरी झाल्याचे समोर येताच तेथील कर्मचारी आणि कार्यालयात ये जा करणाऱ्या इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. हा प्रकार समोर येऊ नये तसेच या चोरीची वाच्यता होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांकडून गयावया करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सूत्रांनी तशी माहिती दिली आहे.

नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

काही दिवसांपूर्वी याच मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्क आणि झिरवळ यांच्या पीएवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या दोघांनी मिळून मेडिकलच्या दुकानदाराकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याचा दावा करण्यात आला होता. औषध विक्रीच्या परवान्यासंदर्भात ही लाच मागितली जात असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणामुळेही मंत्रालय चांगलेच चर्चेत आले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us