‘कोरोनाचा धोका वाढलाय, एमपीएससी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकला’

| Updated on: Feb 24, 2021 | 2:24 PM

सरकारने शाळा महाविद्यालये तसेच खासगी क्लासेसवर निर्बंध आणले आहेत. | Coronavirus

कोरोनाचा धोका वाढलाय, एमपीएससी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकला
मराठा क्रांती मोर्चा
Follow us on

कोल्हापूर: राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याने पुढील आठवड्यात होऊ घातलेली वैद्यकीय प्रवेश परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. ही मागणी डावलून परीक्षा झाल्यास आम्ही त्याला विरोध करु, अशा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे नेते दिलीप पाटील यांनी दिला. (Maratha Kranti morcha demands to postpone MPSC and medical entrance exam )

ते बुधवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने सरकारने शाळा महाविद्यालये तसेच खासगी क्लासेसवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला असून परीक्षेत त्यांना याचा फटका बसू शकतो, असे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले. याशिवाय, नोकरभरतीही पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

नोकर भरती पुढे ढकला: विनायक मेटे

सर्वोच्च न्यायालयात 8 मार्च रोजी मराठा आरक्षणाच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नोकरभरतीची प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली. काही मंत्र्यांकडून नोकरभरती रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचा नोकरभरतीला विरोध नाही. मात्र, त्यामुळे मराठा समाजातील मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे आरोग्य विभागाची भरती 1 एप्रिलपर्यंत पुढे ढकलावी, अशी मागणी मेटे यांनी केली.

‘सर्वकाही केंद्र सरकारने केले तर महाविकासआघाडी फक्त भज्या खात बसणार का?’

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, असे महाविकासआघाडीचे नेते म्हणतात. मात्र, सर्व गोष्टी केंद्र सरकारनेच केल्या तर यांनी फक्त भजं खात बसायचं का, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला. महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजाचा उपयोग फक्त सत्ता मिळवण्यासाठी केला. नोकरभरती रोखण्यामध्ये मराठा समाजातीलच काही मंत्री आघाडीवर आहेत. हे मंत्री मराठा समाजाचे वैरी असल्याची टीका विनायक मेटे यांनी केली.

संबंधित बातम्या:

बुलडाण्यात एकाच गावातील 155 जणांना कोरोनाची लागण; धार्मिक कार्यक्रमातून संसर्ग?

मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का, रेल्वेचे अधिकारी म्हणतात..

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांना प्रवेशासाठी कोरोना अहवाल सक्तीचा

(Maratha Kranti morcha demands to postpone MPSC and medical entrance exam )