मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का, रेल्वेचे अधिकारी म्हणतात..

1 फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. | Coronavirus Mumbai local train

मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का, रेल्वेचे अधिकारी म्हणतात..
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 8:50 AM

मुंबई: कोरोना रुग्णांची  संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्यामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) पुन्हा ब्रेक लागण्याची चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील विविध यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. (Mumbai local train may halt again if coronavirus cases increases)

‘डीएनए’च्या माहितीनुसार, या बैठकीत अधिकाऱ्यांनी लोकल ट्रेन सुरु झाल्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याची एक शक्यता बोलून दाखवण्यात आली. 1 फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर साहजिकच लोकल ट्रेनमधील गर्दी वाढली होती. तेव्हापाासूनच मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. त्यामुळे आता लोकल ट्रेन पुन्हा बंद होण्याची शक्यता वाढली आहे.

रेल्वेची अधिकारी काय म्हणाले?

मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का या प्रश्नावर पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी म्हटले की, पश्चिम रेल्वेकडून कोरोना रोखण्यासाठी सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. आम्ही पुन्हा एकदा ट्रेन सॅनिटाईज करायला सुरुवात केली आहे. याशिवाय, प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून 300 तिकीट खिडक्या सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर दिवसाला 1300 फेऱ्या चालवल्या जात आहेत. आम्ही राज्य सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन करत असल्याचे सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

मुंबईचे पालकमंत्री काय म्हणाले?

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने आणखी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलवण्यात आल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. “काही दिवसांआधी मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता. रुग्णसांख्या कमी झाली नाही तर काय करणार यासाठी बैठक बोलावली आहे. लोकल ट्रेन संख्या कमी करावी का, बस रूट बदलावा का, खाऊ गल्ली बंद करायची का, हॉटेलची वेळ, सार्वजनिक ठिकाणी काय कारवाई करता येईल, यावर चर्चा होईल”, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

संबंधित बातम्या:

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची भीती, विनामास्क प्रवाशांवर रेल्वेतही कारवाई

Mumbai Local train latest update : सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सुरु

मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत वाढ, माहीम, दादर, धारावीमध्ये कोव्हिड चाचण्यांचे प्रमाण वाढवले

(Mumbai local train may halt again if coronavirus cases increases)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.