युक्रेनमधून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या हालचाली, आरोग्य विद्यापीठ काय काढणार तोडगा?

| Updated on: Mar 06, 2022 | 11:30 AM

कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या की, आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात युक्रेनहून परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींमध्ये त्यांना कशी मदत करता येईल याबाबतीत महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले होते. त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत.

युक्रेनमधून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या हालचाली, आरोग्य विद्यापीठ काय काढणार तोडगा?
Maharashtra University of Health Sciences, Nashik
Follow us on

नाशिकः युद्धग्रस्त युक्रेनमधून (Ukraine) परतणाऱ्या वैद्यकीय विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती गोळा करण्यास नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (University) प्रारंभ करण्यात आला आहे. त्याचबरोबर नॅशनल मेडिकल (Medical) कमिशनकडे या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित करणेबाबत कोणती योजना आहे काय, याबाबत विद्यापीठातर्फे विचारणा करण्यात आली आहे. याबाबत सुस्पष्टता व निर्देश प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले. कुलगुरू म्हणाल्या की, आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात युक्रेनहून परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींमध्ये त्यांना कशी मदत करता येईल याबाबतीत महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले होते. यादृष्टीने विद्यापीठातर्फे www.muhs.ac.in या संकेतस्थळावर अर्ज देण्यात आला आहे. या अर्जाद्वारे विद्यार्थ्यांनी योग्य माहिती भरून पाठवायची आहे.

काय काढणार तोडगा?

कलगुरू कानिटकर म्हणाल्या की, देशातील सर्व वैद्यकीय विद्याशाखांचे प्रवेश ‘नीट’ प्रवेश पद्धतीद्वारे गुणवत्ता आधारित होत असल्याने युद्धग्रस्त युक्रेनमधील विद्यार्थ्यांना येथील महाविद्यालयात सरळ प्रवेश देता येणे शक्य नाही. मात्र, मानवतावादी दृष्टीकोनातून हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तिथे गेले असल्याने त्यांची विशिष्ट आकांक्षा लक्षात घेऊन त्यांच्या तेथील शिक्षणाबाबत विश्वासार्ह मूल्यांकन परीक्षा आयोजित करता येणे अशा सर्व बाबींचा विचार करण्यासाठी वस्तुनिष्ठ माहिती असणे आवश्यक आहे.

कशी मागवली माहिती?

कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या देशांतर्गत आरोग्य शिक्षणाच्या दर्जासाठी कोणतीही मानके कमी केली जाणार नाहीत. मात्र, यात सर्वच भागधारकांच्या सूचना, निर्देश यांचा अभ्यास करून निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, यात विद्यार्थ्यांनी त्यांचे वैयकितीक व शैक्षणिक तपशील भरून ते ई-मेलद्वारे eligibility@muhs.ac.in या ई-मेलवर पी.डी.एफ. स्वरुपात द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या देशांतर्गत आरोग्य शिक्षणाच्या दर्जासाठी कोणतीही मानके कमी केली जाणार नाहीत. मात्र, यात सर्वच भागधारकांच्या सूचना, निर्देश यांचा अभ्यास करून निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.

– माधुरी कानिटकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?