Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?

नाशिककरांसाठी एक कटू बातमी. बांधकाम संघटना क्रेडाईने घरांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति चौरस फुटामागे पाचशे रुपयांनी या किमती वाढणार आहेत. आधीच वाढलेली महागाई, जगात भडकलेले युद्ध आणि त्यात घरांच्या वाढलेल्या किमती. याचा परिणाम हजारो मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांवर होणार असून, त्यांचे स्वप्नातले घर अजून दुरापास्त होईल,असेच म्हणावे लागेल.

Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?
गृह कर्ज घेताना तुम्हाला ‘या’ शुल्काबाबत माहिती हवीच
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 9:32 AM

नाशिकः घर पाहून बांधून आणि लग्न पाहावं करून, अशी म्हण आहे. कारण या दोन्हींसाठी आर्थिक पाठबळ अतिशय मोलाचे ठरते. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात स्वतःचे घर एकदाच होते, तर अनेकांच्या आयुष्यात ते स्वप्न म्हणूनच राहते. मात्र, येणाऱ्या काळात नाशिककरांसाठी (Nashik) एक कटू बातमी. बांधकाम संघटना क्रेडाईने (Credai) घरांच्या (Home) किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति चौरस फुटामागे पाचशे रुपयांनी या किमती वाढणार आहेत. आधीच वाढलेली महागाई, जगात भडकलेले युद्ध आणि त्यात घरांच्या वाढलेल्या किमती. याचा परिणाम हजारो मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांवर होणार असून, त्यांचे स्वप्नातले घर अजून दुरापास्त होईल,असेच म्हणावे लागेल.

का वाढवल्या किमती?

क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात महाजन म्हणाले की, सध्या स्टील आणि सिमेंटच्या किमतीत वाढ झाली आहे. फॅब्रिकेशन, अॅल्युमिनियम, वायर, विटा, वाळू, खडी या बांधकाम साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. येणाऱ्या काळात या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे देणे अवघड होत चालले आहे. हे पाहता किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती त्यांनी दिली.

जीएसटी कमी करा

रवी महाजन म्हणाले की, सध्या सिमेंटवर 28 टक्के जीएसटी आहे. स्टील, इतर बांधकाम साहित्यावर 18 टक्के जीएसटी आहे. हे दर कमी करावे, याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. आमची राष्ट्रीय क्रेडाई संघटना त्यासाठी पाठपुरावा करत आहे. ती मागणी मान्य झाली, तर आम्हाला नक्कीच घरांच्या किमतीत वाढ करण्याची गरज पडणार नाही. मात्र, हा निर्णय कधी होणार, नागरिकांना दिलासा मिळणार का, हे येणारा काळच सांगेल.

युद्धाचाही फटका

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख झाली आहेत. या युद्धाचा साऱ्या जगावर परिणाम होणार आहे. इंधन दर आपसुकच वाढतील. त्यामुळे अन्नधान्यापासून ते सर्व क्षेत्रात महागाई येईल. कारण वाहतुकीचे दरही वाढतील. त्यात एक एप्रिलनंतर मुद्रांक शुल्क वाढेल. त्यामुळे घराच्या किमतीत वाढ होईल. अशाने सामान्यांचे घराचे स्वप्न स्वप्नच राहू नये म्हणजे झाले.

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

मुंबई पालिका काबिज करण्यासाठी भाजपचा प्लान काय, मराठी कट्टा बीजेपीला तारणार?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.