Milk Price Hike: सणासुदीत मुंबईकरांच्या खिशाला बसणार कात्री, साखरेनंतर दुध महाग, किती रुपयांनी वाढले दर?

Milk Rate Hike: मागील एक दोन दिवस साखरेने भाव खाल्ल्यानंतर आता दुधाच्या किमतीतही भाववाढ होणार असल्याची माहिती समोर आली. आता दुधाच्या किमतीत किती रुपयांनी भाववाढ होणार आहे ते पाहा..

Milk Price Hike: सणासुदीत मुंबईकरांच्या खिशाला बसणार कात्री, साखरेनंतर दुध महाग, किती रुपयांनी वाढले दर?
| Updated on: Aug 28, 2026 | 9:53 AM

हिरा ढाकणे: काही दिवसांत महागाई सातत्याने वाढ होताना दिसत आहे.  पण आता यावेळी या महागाईचा फटका हा मुंबईकरांच्या खिशालाच बसणार आहे. मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसवणारी बातमी आता समोर आली आहे. दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमती तसेच पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने आता ही भाववाढ होणार असल्याचे समोर आले आहे. आता मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही वाढ 9 रुपयांनी होणार आहे.

मुंबईत सध्याचा दुधाचा घाऊक दर प्रतिलिटर 93 रुपये आहे. भाव वाढीमुळे तो 102 रुपये होण्याची शक्यता आहे, मुंबईत हे नवे दर 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीसाठी वाढवले जाणारआहे. अगदी सणासुदीच्या तोंडावर दुधाचे दर वाढवल्याने लोकांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. नवीन महिन्याची सुरुवातच दरवाढीने होणार असल्याने आता ग्राहकांची चिंता वाढली आहे. बैठकीत दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमतींबरोबरच दाणा, तूरचुणी, चणाचुणी आदी पशुखाद्यांच्या दरात 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात तसेच चारा, पेंड आदींच्या किमतीतही वाढ झाल्याने दूध उत्पादकांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading...

मागील एक ते दोन दिवस साखरेच्या किमतीत भाववाढ झाल्याची माहिती समोर आली होती. सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किमतीतील भावावढ ही लोकांसाठी टेन्शन वाढवणारी ठरणार आहे. कारण दूधाच्या किमती वाढणार, साखरेच्या किमतीत भाववाढ यामुळे आता लोकांचे बजेट बिघडणार आहे. भविष्यातही ही साखरेची भाववाढ कायम राहिल्यास खिशाला मोठी झळ बसणार. यामुळेच प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना साखर साठा करता येणार नाही असे म्हटले आहे. 30 दिवसांपेक्षा जास्त साठा विक्रेत्यांना करता येणार नाही. परिपत्रकानुसार कोणत्याही ठिकाणी ४,००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us